Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो, ऑक्सिजनसाठी चक्क झाडल्या 3 गोळ्या; पहा कुठे घडला असा दुर्दैवी प्रकार

अहमदाबाद :

Advertisement

सध्या देशभरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य विभागाने केला आहे. त्याचवेळी उत्तरप्रदेश राज्यात पोलिसांनी एका व्हीआयपी व्यक्तीसाठी गरीबांचा सिलिंडर पालावाल्याचा व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहे. त्याचवेळी गुजरात राज्यात तर ऑक्सिजन सिलिंडरसाठी एका व्यक्तीने थेट 3 गोळ्या झाडल्याची बातमी आली आहे. प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनसाठीच आता अनेकजण एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या या बातम्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत.

Advertisement

कोरोनाच्या कहरामध्ये देशातील अनेक राज्ये ऑक्सिजनच्या कमतरतेशीही झगडत आहेत. रुग्णालयांमध्येही ऑक्सिजनची कमतरता असल्याने आतापर्यंत हजारो रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. दरम्यान अशा संकटाच्या परिस्थितीत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी हिंसक संघर्ष होण्याची बातमी आहे. येथील एका प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये भांडण झाले. या चकमकीदरम्यान एका व्यक्तीने त्याच्या पिस्तूलने जमिनीतचक्क तीन गोळ्याही झाडल्या.

Advertisement

पोलिसांनी याप्रकणी सांगितले की, सोमवारी रात्री भचाऊ नगर जवळील मोटा चिराई या गावात ऑक्सिजन भरणाऱ्या केंद्रावर काही लोक संतप्त झाले आणि तिथे थांबलेल्या दुसऱ्या गटाशी त्यांची हाणामारी झाली. भचाऊ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले आहे की, या चकमकीच्या वेळी राजभा जडेजा या नावाच्या व्यक्तीने पिस्तूल काढून लोकांना घाबरवण्यासाठी जमिनीत तीन गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply