Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : अखेर ‘तो’ दुर्दैवी आकडा भारताने केला पार; 3 लाख रुग्णांना मिळाला डिस्चार्जही

मुंबई :

Advertisement

करोना कहरामध्ये अवघे जग संकटात आहे. आरोग्याच्या सुविधांकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका आता अवघ्या जगभरातील नागरिकांना बसत आहे. त्यातही भारत देश आता आघाडीवर आहे. भारताने एकाच दिवशी (24 तासात) तब्बल 4 लाख रुग्णसंख्या वाढण्याचा दुर्दैवी आकडा अखेर पार केला आहे. कुंभमेळा आणि निवडणुकांचा हंगाम या देशाला भोवला असल्याचे आता स्पष्टच दिसत आहे.

Advertisement

ANI on Twitter: “India reports 4,01,993 new #COVID19 cases, 3523 deaths and 2,99,988 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry Total cases: 1,91,64,969 Total recoveries: 1,56,84,406 Death toll: 2,11,853 Active cases: 32,68,710 Total vaccination: 15,49,89,635 https://t.co/S56SPyLZtq” / Twitter

Advertisement

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. तसेच पंढरपूरसह अनेक ठिकाणच्या पोटनिवडणूक आणि उत्तरप्रदेश राज्यातील पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीचे निकालही लागणार आहेत. मात्र, त्याचवेळी जिथे निवडणुका झाल्या त्या भागात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कुंभमेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रमातूनही करोना पसरल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे एकाच दिवशी मागील फ़क़्त 24 तासात भारतात तब्बल 4 लाख 1 हजार 993 इतकी रुग्णसंख्या वाढली आहे. तर, 2,99,988 रुग्णांना बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Advertisement

आकडेवारी अशी :

Advertisement
  1. मागील 24 तासामधील रुग्णावाढ : 4,01,993
  2. आतापर्यंतछे एकूण रुग्ण : 1,91,64,969
  3. बरे होऊन घरी गेलेले : 1,56,84,406
  4. एकूण मृत्यू : 2,11,853
  5. सध्याची बाधित रुग्णसंख्या : 32,68,710
  6. लसीकरण आकडा : 15,49,89,635

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply