Take a fresh look at your lifestyle.

म्हणून 2013 मधील फडणवीसांचे ‘ते’ स्टेट्स पुन्हा ट्रेंडमध्ये; पहा नेमके काय म्हटलेले आहे त्यामध्ये

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छांचा पाऊस सध्या ट्विटर, फेसबुक आणि सोशल मिडीयामध्ये पडत आहे. ऐन करोना संकटातही अवघा महाराष्ट्र आपला स्थापना दिन व्हर्च्युअली मोठ्या दणक्यात साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने आपली भावना व्यक्त केली आहे. त्याचवेळी फडणवीस यांचे डिसेंबर 2013 मधील एक स्टेटस् पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेले आहे.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “I voted for Separate #Vidarbha,DID YOU? Voting available at more than 600 public places at #Nagpur. Vote NOW ! http://t.co/E2u8lGpZOx” / Twitter

Advertisement

दिवंगत नेते व विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्यासह अनेकांनी आतापर्यंत वेगळ्या विदर्भाची हाक दिली आहे. अगोदर मध्य प्रांताची राजधानी असलेल्या नागपूरला विदर्भाची राजधानी करून नवे राज्य निर्माण करण्याची मागणी खूप जुनी आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांचा पाठींबा आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी वेळोवेळी आपली ही भूमिका मांडली होती. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या भूमिकेबद्दल वाच्यता केलेली नाही. तसेच एकसंघ महाराष्ट्र राज्य असावा, असाही ठोस आग्रह कधीही धरलेला नाही. त्यावरून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “गर्जा महाराष्ट्र माझा… भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay https://t.co/bEnP3rEnzv” / Twitter

Advertisement

आजही महाराष्ट्र दिनानिमित्त फडणवीस यांनी म्हटले आहे की, गर्जा महाराष्ट्र माझा… भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा! दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा!

Advertisement

मात्र, त्याचवेळी फडणवीस यांची 16 डिसेंबर 2013 रोजीची ट्विटर पोस्ट ट्रेंडमध्ये आली आहे. त्यामध्ये फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर मतदान करीत आहेत. नागपूरसह विदर्भात त्यावेळी कौल जनमताचा म्हणून एक मतदान स्वयंसेवी संस्थांनी घेतले होते. त्यात वेगळा आणि स्वतंत्र विदर्भ असावा यासाठी फडणवीस यांनी मतदान केले होते. तोच फोटो आणि ट्विटर पोस्ट सध्या वेगाने व्हायरल केली जात आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply