Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. बेवारस ट्रकमध्ये सापडले तब्बल 2.40 लाख लसचे डोस; पहा कुठे आणि कसा घडलाय ‘हा’ प्रकार

मुंबई :

Advertisement

देशभरात सध्या करोना विषाणूवर लस मिळण्याची धडपड महाराष्ट्रासह अनेक राज्ये करीत आहेत. सध्या फ़क़्त केंद्र सरकारकडे हे लसचे डोस पुरवठा केले जात आहेत. राज्यांसाठी खुले झालेले आहेत, मात्र, दि. 20 मे 2021 पर्यंतचे डोस केंद्र सरकारने बुक केल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. असे असतानाही मध्यप्रदेश राज्यात तब्बल 8 कोटी रुपयांचे करोना लसचे डोस चक्क बेवारस सापडले आहेत. त्यामुळे लसचा काळाबाजार हा मुद्दाही पुन्हा चर्चेत आलेला आहे.

Advertisement

अमर उजाला या राष्ट्रीय माध्यम सामुकाहेन याची ब्रेकिंग न्यूज दिली आहे. त्यात म्हटले आहे की, देश सध्या कोरोना विषाणू आणि लसच्या कमतरतेच्या समस्येशी लढत आहे. लस नसल्यामुळे अनेक राज्यात लसीकरण कार्य थांबविण्यात आले आहे. दुसरीकडे लसच्या वाहतुकीत मोठा निष्काळजीपणा उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील नरसिंगपूरमध्ये रस्त्याच्या कडेला एक ट्रक सापडला आहे. चालू स्थितीत असलेल्या या ट्रकमध्ये थेट लस सापडल्या आहेत. तब्बल 2.40 लाख लसचे डोस आहेत यात. करेली बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला कंटेनर ट्रकमध्ये कोवैक्सीनचे अडीच लाख डोस सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. ट्रकचालक व त्याचे साथीदार दोघेही फरार आहेत. केंद्र आणि राज्य यांच्यात लसबाबत वाद निर्माण झालेला असताना हा मोठा साठा नेमका कुठे जात होता, असा प्रश्न पडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

Advertisement

Amar Ujala on Twitter: “Vaccination: आज से 18+ को भी लगेगी वैक्सीन, इन राज्यों में नहीं होगा वैक्सीनेशन, जानें अपने राज्य का हाल #CoronavirusPandemic #CoronavirusIndia #CoronaVaccine #CoronaVaccination https://t.co/dUThyPgZ2M” / Twitter

Advertisement

एक ट्रक बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला उभा असल्याची माहिती कारेली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच वाहनचे कागदपत्र तपासले. त्यातून स्पष्ट झाले की, गुरुग्राम येथील टीसीआय कोल्ड चेन सोल्यूशन कंपनीचा कंटेनर असून भारत बायोटेक कंपनीचे 2 लाख 40 हजार करोना लस डोस हैदराबादहून करनालकडे घेऊन जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर ट्रकमध्ये कोव्हाक्सिनचे सुमारे अडीच लाख डोस अर्थात 364 बॉक्स सापडले आहेत. ज्याची किंमत सुमारे 8 कोटी आहे. पोलिसांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरचे मोबाईल ट्रेसिंग केले आहे. ज्याचे लोकेशन 15 किमी दूर जंगलात दिसले आहे. येथून मोबाइल जप्त केले आहेत.

Advertisement

संपूर्ण देशात लसची कमतरता आहे. तर, दुसरीकडे त्याचा काळाबाजार देखील जोरात सुरू आहे. यापूर्वीही मध्यप्रदेशात लस काळ्या बाजाराच्या मिळत असल्याच्या बातम्या चर्चेत आलेल्या आहेत. ज्यांनी लस दिली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. असे असूनही असा ट्रक सापडणे हे अनेक प्रश्नांना जन्म देणारे आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि काही मोठे षडयंत्र उघड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तपास केला जातो की त्याला वेगळेच फाटे फुटतात, यावर या प्रकरणाचे ‘सत्य’ समोर येणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

News Link : Corona Vaccine Truck Found Near Road Side In Narsinghpur In Madhya Pradesh – लापरवाही: लावारिस मिला 8 करोड़ की कोवैक्सीन से लदा ट्रक, कहां जा रही थीं 2.40 लाख डोज? – Amar Ujala Hindi News Live http://www.amarujala.com/madhya-pradesh/corona-vaccine-truck-found-near-road-side-in-narsinghpur-in-madhya-pradesh

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply