Take a fresh look at your lifestyle.

कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; 15 जणांचा मृत्यू

भरूच :

Advertisement

शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास भरुचमधील (गुजरात) पटेल वेलफेयर कोविड रुग्णालयात भीषण आग लागून 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा देश पुन्हा एकदा हादरला आहे. रुग्णालयातील आगीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी देशभरात विशेष कार्यवाही करण्याची मागणी त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियामध्ये केली आहे.

Advertisement

आगीमुळे रुग्णालय व परिसरातील वीज बंद पडल्याने बचावकार्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अग्निशमन दलाची 12 वाहने व 40 रुग्णवाहिका तातडीने बोलावण्यात आलेल्या होत्या. त्याद्वारे बचावकार्याला गती देण्याचा प्रयत्न झाला. शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना बाहेर काढले गेले व दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, नवे रुग्ण बराच काळ बेड्स आणि ऑक्सिजनसाठी प्रतिक्षा करत होते. त्याचवेळी नातेवाईक आपल्या रुग्णांसाठी मदतीची याचना करताना दिसत होते.

Advertisement

आगीची घटना घडल्यावर मदतीला कमी आणि बघ्यांची गर्दी जास्त झाल्यानेही अडथळे येत होते. रुग्णालयाच्या आजुबाजूला सुमारे 5 हजार लोकांची गर्दी होती. ते ओरडत होते आणि सगळीकडे गोंधळ सुरू होता, असे भयाण चित्र भरूच येथील रुग्णालयात पाहायला मिळत होते. काही तासांच्या प्रयत्नांनंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सकाळपर्यंत बचावकार्य सुरूच होते. प्राथमिक तपासणीत आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर आले.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply