Take a fresh look at your lifestyle.

माणुसकीला काळिमा : VIP साठी पोलिसांनीच पळवला गरीबांचा ऑक्सिजन सिलिंडर; पहा नेमकी काय घडली घटना

दिल्ली :

Advertisement

सध्या देशभरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने यामुळे होणाऱ्या मृत्युंकडेच सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. अशावेळी अतिमहत्वाच्या व्यक्तींना कशी सर्व सेवा मिळते आणि गरिबांना यासाठी ‘व्यवस्थे’पुढे कसे हात पसरावे लागतात हे सर्वजण पाहत आहेत. त्याचवेळी उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा शहरातील एक भयंकर प्रकरण चर्चेत आहे. इथे एका व्हीआयपी व्यक्तीसाठी चक्क एका गरिबाने आणलेला ऑक्सिजन सिलिंडर पळवण्याचे ‘महान कार्य’ पोलीस यंत्रणेने केले आहे. ऑक्सिजनअभावी त्या गरीब महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी नवभारत टाईम्स यांनी दिली आहे.

Advertisement

माणुसकीला काळिमा कसा फसला जातो याचे हे प्रकरण समोर आले आहे. आपल्या आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या 17 वर्षीय मुलाकडून सिलिंडर हिसकावून घेण्याची ही दुर्दैवी घटना आहे. मुलगा पोलिसांसमोर जमिनीवर बसून हात जोडून ओरडत ऑक्सिजन सिलिंडर मागत होता. परंतु, पोलिस त्याचे ऐकत काहीही नव्हते. या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओत आईला वाचवण्यासाठी मुलगा म्हणत आहे की, ‘माझी आई मरेल. सिलिंडर घेऊ नका. मी ऑक्सिजनची व्यवस्था कोठे करू?’

Advertisement

OpIndia.com on Twitter: “Viral video claimed that the oxygen cylinder was forcefully taken away for a ‘VIP’ in Agra https://t.co/4RFaNU9AVo” / Twitter

Advertisement

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अतिरिक्त महासंचालक (एडीजी) राजीव कृष्णा यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचे पुढे काय होणार यावर खऱ्या अर्थाने ‘सिस्टीम’चे यश ठरणार आहे. असे सांगितले जात आहे की, काही पोलिस आग्रा येथील रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर घेण्यासाठी आले होते. येथे त्याने एका मुलाला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाताना पाहिले आणि तो त्याच्याकडून तो पोलिसांनी हिसकावून घेतला. व्हिडिओमध्ये पीपीई किट परिधान केलेला मुलगा पोलिसांच्या पाया पडून रडत आहे.

Advertisement

हा व्हिडिओ आग्रा येथील उपाध्याय रुग्णालयाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा अंश गोयल आहे. त्याने सांगितले की आपल्या आईसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करुन तो मोठ्या जिकिरीने सिलिंडर घेऊन आला होता. परंतु कोण्या एका ‘व्हीआयपी’ साठी पोलिसांनी त्याच्याकडून हे सिलिंडर काढून घेतले. त्यानंतर आईचे दोनच तासानंतर निधन झाले. यावर एडीजी राजीव कृष्णा म्हणाले की, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, चौकशीच्या आदेशापूर्वीच स्थानिक पोलिसांनी ऑक्सिजन सिलिंडर रिकामे असल्याचे सांगितलेले आहे.

Advertisement

Siddharth on Twitter: “This video from Agra is one of the most horrible I have seen @IsmatAraa tracked down the family and reports on their story for @thewire_in: https://t.co/RvWQetHIFX” / Twitter

Advertisement

वरिष्ठ पोलीस अधिकारी बोत्रे रोहन प्रमोद (एसपी, आग्रा) यावर म्हणाले आहेत की, दोन दिवस आग्रा शहरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. यामुळे रूग्णाच्या उपचारासाठी खासगी सिलिंडर रुग्णालयात नेले जात होते. रिक्त सिलिंडर बाहेर येत होते. व्हिडिओमध्ये एक माणूस रिक्त सिलिंडर घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. हे पाहून आणखी एक व्यक्ती स्वत:ला सिलिंडर घेण्याची विनंती पोलिसांना करत आहे. या व्हिडिओ पोलिसांच्या समवेत जोडून चुकीच्या पद्धतीने सादर केला होता. तो चुकीचा व्हिडिओ आहे. दरम्यान, पोलीस तपासातून नेमके काय पुढे येतेय त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Srivatsa on Twitter: “A man is seen begging the police not to take a Oxygen cylinder he has arranged for his mom in Agra, UP Why are the cops taking away the cylinder from a hospital? Is it for a VIP? Adityanath, is there not even 1 case of Oxygen shortage in UP? Shameless CM https://t.co/5zNXeITJG1” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply