Take a fresh look at your lifestyle.

वर्ल्ड ‘टाइम’लाईनवर मोदींमुळे भारताचे बनलंय निगेटिव्ह ‘स्टेटस’; पहा नेमके काय केलेय विश्लेषण?

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे भारतीय यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा रोज नवा विक्रम समोर येत आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी ‘वेटिंग’ करावे लागत आहे. भारतातील कोरोनाचे थैमान पाहून जगभरातील देश चिंतेत पडले आहेत.

Advertisement

भारतातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची दखल घेतली असून, भारतातील कोरोना संकटावर वृत्तांकन करण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाचे संकट अधिक गंभीर होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आपल्या वृत्तांकनात दिला होता.

Advertisement

अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘टाइम’ पाक्षिकाने आपल्या मुखपृष्ठावर भारतातील कोरोना संकटाच्या भीषणतेवर भाष्य करणारे एक छायाचित्र प्रकाशित केले आहे. ‘भारत संकटात’ या मथळ्याखाली स्मशानभूमीतील वास्तव दाखवणारे छायाचित्र ‘टाइम’ने प्रकाशित केले आहे.

Advertisement

‘टाइम’साठी नैना बजेकल यांनी भारतातील कोरोनाचे वास्तव दाखवणारी ‘कव्हर स्टोरी’ लिहिली आहे. त्यात म्हटले आहे, की “भारतातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या परिस्थितीत आहे. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रुग्णांसाठीच्या बेडची कमतरता आहे. रेमडेसिवीरसाठी धावपळ करावी लागत आहे. मागणी अधिक असल्यामुळे औषधांची चढ्या दराने विक्री सुरु आहे. वाढत्या कोरोना चाचण्यामुळे प्रयोगशाळांवर ताण वाढला आहे. हे कोरोना संकट फक्त भारतातील १.४ अब्ज नागरिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी भयावह ठरणार असणार आहे.”

Advertisement

जगभरातून मदतीचा ओघ
भारतातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारतीय हवाई दलाने गुरुवारी बँकॉक, सिंगापूर आणि दुबईतून १२ रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर भारतात आणले. थायलंड व सिंगापूरमधून प्रत्येकी तीन, दुबईतून सहा कंटेनर हवाई दलाने भारतात आणले आहेत. हे कंटनेर देशातील विविध शहरातील ऑक्सिजन फिलिंग स्टेशनवर पोहचवण्यात येतील. शिवाय, अमेरिका, ब्रिटन आदी देशांमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेर्सही भारतात दाखल झाले आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply