Take a fresh look at your lifestyle.

घरबसल्या शिवणकामातून कमाई, सरकारही देतंय ‘इतके’ पैसे

मुंबई :

Advertisement

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यापासून अनेकांच्या रोजगारावर गदा आली. काहींचे उदयोगधंदे बुडाले. हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. हाताला काम नसल्याने जगण्याचेच वांधे झाले. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने अशा बेरोजगार लोकांसाठी विशेष योजना आणली आहे. त्याद्वारे घरबसल्या कमाई करता येणार आहे. काय आहे ही योजना, त्यातून कशा प्रकारे कमाई होऊ शकेल, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

हातातील नोकरी गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांना प्रेरित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार ‘टेलरिंग शॉप योजना’ (Tailoring Shop Scheme) चालवित आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती आणि गरीब तरुण आणि महिलांना शिवणकामासाठी सुमारे 20 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाते.

Advertisement

योजनेत 10 हजार रुपये अनुदान, तर उर्वरित 10 हजार रुपये व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले जातात. शिवणकाम आणि भरतकाम सुरु करणार्‍यांना ‘टेलरिंग’चे प्रशिक्षणही दिले जाते. यासाठी नोंदणी करावी लागते. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील तरुण आणि महिला सहाय्यक आणि ग्रामविकास अधिकारी, समाज कल्याण विभाग, सहाय्यक व्यवस्थापक व विकास भवन स्थित विभाग यांच्याशी संपर्क करु शकता. येथे योजनेशी संबंधित फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत.

Advertisement

या योजनेचे फायदे
टेलरिंग शॉप योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचे कर्ज वित्त विकास महामंडळामार्फत दिले जाईल. लाभार्थ्याला त्यात कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर कर्जाची मूळ रक्कम परत करण्यासाठी त्यांना तीन वर्षांचा पुरेसा कालावधी मिळेल. अर्जदारांना त्यांची कर्जफेड हप्त्यांमध्येही करता येईल.

Advertisement

लाभ कोणाला मिळणार?
टेलरिंग योजनेंतर्गत जे लोक समाजकल्याण विभाग, उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण योजना किंवा राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत तयार केलेल्या बचतगटांचे लाभार्थी आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल. या व्यतिरिक्त विशेष अधिसूचित जाती प्रवर्गातील गरीब तरुणांना या योजनेत समाविष्ट केले जाईल.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply