Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात घसरण, पहा सेन्सेक्स व निफ्टीची स्थिती!

मुंबई : शेअर बाजारात काल (ता.29) मोठी तेजी दिसून आली होती. मात्र, या तेजीचा तोरा आज (ता. 30) दुसऱ्याच दिवशी उतरला. भांडवली बाजारात (stock market) आज (ता.30) मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या चार सत्रात वधारलेल्या शेअरमध्ये नफेखोरांनी संधी साधली. त्यामुळे आज (शुक्रवारी) सेन्सेक्स (sensex) ३८० अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (nifty) ९५ अंकांनी घसरला.

Advertisement

सध्या भांडवली बाजारात बँकिंग, वित्तीय सेवा, फार्मा, आयटी क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरु आहे. आजच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय या शेअरमध्ये घसरण झाली. दुसरीकडे निफ्टी बँक इंडेस्कवर पीएनबी बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, इंड्सइंड बँक, बंधन बँक आदी शेअर वधारले आहेत.

Advertisement

जागतिक बाजारातील घडामोडींचे पडसाद भारतीय बाजारावर उमटत असतात, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले. देशात रोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही देखील गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

सेन्सेक्स ४७६ अंकांनी घसरला असून, तो ४९,२८९ अंकावर होता, निफ्टी १२० अंकांनी कोसळला असून, तो १४,७७४ अंकावर होता]. १४२२ शेअर तेजीत, तर ११३४ शेअर घसरले. चलन बाजारात रुपया डॉलर (Dollar) समोर ७४.०४ वर स्थिर होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ८०९ कोटीचे शेअर खरेदी केले, तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९४२ कोटीचे शेअर विक्री केले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply