Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्यात ‘या’ सूचना; फ़क़्त ‘त्या’ दोनच सेवा राहणार चालू?

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण जनता कर्फ्यू पुकारून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु असतानाही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयातकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे,  जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस उप अधीक्षक प्रांजल सोनवणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.   

Advertisement

बैठकीतील मुद्दे असे :

Advertisement
  • नागरिकांचे आरोग्य सर्वांत महत्वाचे असून ते जपणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले. पुढील तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी आणि या दोन कोरोना लाटांचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
  • संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने आता कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी आता क्रियाशील होण्याची आवश्यकता आहे.
  • संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑक्सीजनची उपलब्धता, औषधांची उपलब्धता, बेडस् उपलब्धता या बाबींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा नियोजन ऩिधीतील ३० टक्के रक्कम कोविड उपाययोजनांसाठी उपयोगात आणण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्लान्टसाठी ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून अहमदनगर, कर्जत, श्रीरा्मपूर, पाथर्डी, संगमनेर येथे २५० जम्बो सिलींडर दैनंदिनरित्या भरतील एवढ्या क्षमतेने ऑक्सीजन निर्मिती अपेक्षित असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल.
  • सध्या आपण १०० ऑक्सीजन कॉ़न्स्नट्रेटर प्राप्त करुन घेतले आहेत. त्यासाठी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या बाबींव्यतिरिक्त जिल्ह्यातील आमदार महोदयांनी त्यांचा निधी आरोग्यविषयक त्या-त्या भागातील अत्यावश्यक सुविधांसाठी उपयोगात आणावा, अशी सूचनाही श्री. मुश्रीफ यांनी केली.  आगामी काळात जिल्ह्यासाठी लागणारी औषधांची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयास या बाबींसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर एकच लॅब आहे. अजून एक लॅब निर्मितीसाठीही निधीची उपलब्धता करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीर वाटप महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र याप्रमाणे केले जात आहे. सध्या पाहिजे त्याप्रमाणात रेमडेसीवीर उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती असली तरी जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेला साठा हा नागरी भाग आणि ग्रामीण भागासाठी समप्रमाणात वाटप केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply