Take a fresh look at your lifestyle.

आणि शिक्षकांनी दिले निवडणूक आयोगालाच आव्हान; पहा काय अडचणी वाढल्यात सरकारी यंत्रणेच्या

दिल्ली :

Advertisement

महाराष्ट्रात असो नाहीतर कुठेही असो, शिक्षक संघटना या डॉक्टर संघटनेप्रमाणे एकसंघ आणि पॉवरफुल असतात. अनेकदा प्रशासकीय अडवणूक करण्याची आपली ताकद दाखवलेल्या शिक्षक संघटनांनी आता थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. त्यामुळे करोना संकटातील समस्यांमध्ये अडकलेल्या सरकारी यंत्रणेला घाम फुटला आहे. करोना विषाणूच्या दुसऱ्या पॉवरफुल लाटेत मतमोजणी पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. त्याला अनेकांनी पाठींबा दिला आहे.

Advertisement

उत्तरप्रदेशमधील कोरोना व्हायरसचा वेग अनेकांच्या काळजाचा ठेका चुकवणारा आहे. येथेही दररोज 34 हजाराहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. त्यातच शुक्रवारी या राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2 मे रोजी (यूपी पंचायत चुनाव) पंचायत निवडणूक मतमोजणीची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, प्राथमिक शिक्षक महासंघाने निवडणूक आयोगाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शिक्षक महासंघाची मागणी आहे की, 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला किमान दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. अन्यथा मतमोजणी कामत असलेले शिक्षक त्याचा खुला बहिष्कार घालतील. जर काही अनागोंदी असेल तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल.

Advertisement

शिक्षक महासंघाने 706 मृत शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. शिक्षक संघटनेने असा आरोप केला आहे की, प्रशिक्षणापासून ते मतदानापर्यंत राज्य निवडणूक आयोगाने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे कुठेही पालन केले नाही. ज्यामुळे परिस्थिती भयावह बनली आहे. कोविड संसर्गामुळे निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शेकडो शिक्षकांनी आपला जीव गमावला आहे. आताही मोठ्या संख्येने शिक्षक या आजाराने ग्रासले आहेत, असा दावा फेडरेशनने केला आहे. या शिक्षकांच्या कुटूंबात किती लोक संक्रमित आहेत याचा कोणताही हिशेब नाही. त्यामुळे 2 मे रोजी होणारी मतमोजणी थांबवावी, असे त्यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

शिक्षक महासंघाने राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात पंचायत निवडणुका कोरोना साथीच्या दरम्यान घेण्यात आल्याकडे लक्ष वेधले आहे. दि. 12 एप्रिल रोजीच संघाने निवडणुकीपूर्वी संरक्षण देण्यासाठीच्या आणि मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्याची विनंती केली होती. परंतु त्यासाठी कोणतीही व्यवस्था यंत्रणेने केलेली नव्हती. साथीच्या वेळी शिक्षक व कर्मचार्‍यांना मतदानासाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे अनेक शिक्षकांना आता बाधा झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply