Take a fresh look at your lifestyle.

आणि घडला ‘बर्निंग मोबाईल’चाही थरार; पहा नेमके काय म्हटलेय ‘त्या’ मोबाईलबाबत कंपनी व युझर्सनेही

मुंबई :

Advertisement

मोबाईल ही आता अनेकांची गरजेची वस्तू बनली आहे. काहींना व्यावसायिक कामासाठी, तर अनेकांना मनोरंजन करणारा मित्र म्हणून मोबाईल हवा आहे. तर, असेही अनेकजण आहेत ज्यांना ‘हवा’ करण्यासाठी मोबाईल पाहिजे. मात्र, याच्या वापराचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊन मोबाईल वापरायला पाहिजे. अशाच पद्धतीने एकजणाला एका चीनी कंपनीच्या मोबाईलमुळे ‘बर्निंग मोबाईल’चाही (Mobile burning case) थरार अनुभवास आलेला आहे.

Advertisement

रेडमी स्मार्टफोनशी संबंधित एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो शाओमीच्या (Xiaomi) एका वापरकर्त्याने शेअर केला आहे. नुकत्याच खरेदी केलेल्या रेडमी नोट 9 प्रोला आग लागली असल्याची ही घटना आहे. जरी वापरकर्ता यामधील दुखापतीतून बचावले असले तरी अचानक हा फोन जळून जाने हे वापरकर्त्यासाठी एक भयानक दृश्य होते. प्रियंका पावरा नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर ही घटना तिच्या भावासोबत घडल्याचे शेअर केली आहे. असे लाईव हिंदुस्थान या HT Media यांच्या न्यूज पोर्टलने म्हटलेले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “User shares image of Redmi Note 9 Pro that caught fire, Xiaomi says external force led to damage https://t.co/d0TH0PKtv8 via @indiatoday” / Twitter

Advertisement

प्रियंकाने ट्विट केले आहे की, तिने डिसेंबर 2020 मध्ये तिच्या भावाला रेडमी नोट फोन भेट म्हणून दिला होता. त्याच मोबाईलला 28 एप्रिल 2021 ला आग लागली. त्याच्या भावाने अशीच प्रकरणे वाचली असल्याने त्याने फोनवर लगोलग पाणी टाकले आणि संभाव्य दुखापतीतून ते बचावले. प्रियांकाने बर्न युनिटचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात फोन वाईट प्रकारे जळालेला दिसत आहे. हा फोटो रेडमी नोट 9 मालिकेचा भाग असल्याचे दर्शवित आहे. तो रेडमी नोट 9 (Redmi Note 9) किंवा टीप 9 प्रो ( Note 9 Pro) असू शकते. स्मार्टफोन निर्मात्याने त्या ट्विटला प्रत्युत्तर देत त्याचा तपशील विचारला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

शाओमीने इंडिया टुडे टेकला याबाबत सांगितले आहे की, टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि प्राथमिक तपासणीत बाह्य घटकापासून असे झाल्याचे दिसत आहे. आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रियांकाच्या संपर्कातही आहोत. असे प्रकरण प्रथमच घडत नाही. गेल्या वर्षी रेडमी नोट 6 प्रोला अशीच आग लागली होती. हे प्रकरण गुजरातमधील एका स्थानिक दुकानांशी संबंधित होते. त्या काळात शिओमीने ग्राहकांना नवीन युनिट दिले होते. याव्यतिरिक्तही इतर कंपन्यांच्या फोनमध्येही आग लागल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुढील मुद्द्यांकडे लक्ष ठेऊन आपण मोबाईल आणि आपली व्यक्तिगत सुरक्षा यांची काळजी घ्यावी.

Advertisement
  1. नेहमीच मोबाईल जास्त गरम (Mobile Over Heating) होणार नाही याची काळजी घ्या.
  2. गेम खेळताना अनेकदा मोबाईल जास्त तापतो. त्यामुळे सलग गेम खेळणे टाळा.
  3. उन्हातही तापमान जास्त असल्याने मोबाईल जास्त तापतो. त्यानुसार योग्य ती काळजी घ्यावी.
  4. फोन आपल्याजवळ ठेवून झोपणे टाळा. उशीखाली मोबाईल ठेवण्याची सवय घातक आहे.
  5. रात्रभर चार्जिंगवर फोन ठेऊ नका. कधीकधी जास्त चार्जिंगमुळेही अशी समस्या उद्भवू शकतात.
  6. जास्त बॅटरी खाणारे अ‍ॅप्स वापरू नका.
  7. फोनमध्ये लोकल बॅटरी कधीही वापरु नका. त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते.

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply