Take a fresh look at your lifestyle.

इम्रान खान यांना मोठा झटका; पहा नेमके काय घडलेय पाकिस्तानात

दिल्ली :

Advertisement

भारताचा कुरापतखोर शेजारी असलेल्या पाकिस्तान देशात सध्या पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची डळमळीत झालेली आहे. एकीकडे लष्कर तर दुसरीकडे धार्मिक कट्टर संस्था आणि दहशतवादी यांच्या कात्रीत कचुंबर झालेल्या इम्रान खान यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. कोणी बाहेरील देशांनी नाही, तर त्यांच्याच मतदारांनी पंतप्रधान खान यांना मोठा झटका दिलेला आहे.

Advertisement

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारचे दिवस आता पूर्ण भरत आल्याचा संदेश कराचीकरांनी दिला आहे. कराचीमधील NA-249 संसदीय पोटनिवडणुकीत पाकिस्तानच्या लोकांनी इम्रान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफ यांना धडा शिकविला आहे. या पोटनिवडणुकीत बिलावल भुत्तो जरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कादिर खान मंडोखेल विजयी झाले आहेत. त्यांनी नवाज शरीफ यांची पीएमएल-एनची उमेदवार मिफ्ता इस्माईल यांचा पराभव केला आहे. तर इम्रान यांच्या पक्षाचे उमेदवार अमजद आफ्रिदी थेट पाचव्या क्रमांकावर आहेत.

Advertisement

इम्रान सरकार हटविण्याच्या नावाखाली एकत्रित आल्याचा दावा सर्व विरोधी पक्षांनी केला असला तरी या पोटनिवडणुकीत सर्वांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. विजयानंतर उत्साही बिलावल भुत्तो झरदारी यांनी ट्विट करून कराचीतील मतदारांचे आभार मानले. त्याचवेळी पीएमएल-एनची प्रमुख नेते आणि नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी ट्विट करून निवडणुकीत गोंधळ केल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply