Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : मुलांसाठी प्रथमच जारी झाल्यात गाईडलाईन्स; पहा काय म्हटलेय त्यामध्ये

पुणे :

Advertisement

पहिल्या लाटेत मुलांना बाधा न होणारा करोना विषाणू आता म्युटेशन झाल्यावर बदलला आहे. त्यामुळे अनेक मुलांनाही याची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच सरकारने पहिल्यांदाच मुलांसाठीच्या गाईडलाईन्स सांगितल्या आहेत.

Advertisement

मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका पूर्वीपेक्षा बरेच वाढला आहे. हे लक्षात घेऊन सरकारने प्रथमच कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचना मुलांसाठीही जारी केल्या आहेत. यामध्ये घरातील विलगीकरणासह ऑक्सिजनची पातळी, थ्री-लेयर मास्कची अनिवार्यता आणि इतरही महत्वाचे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये काय सांगितले गेले आहे ते जाणून घेऊया :

Advertisement
 1. प्रोटोकॉलमध्ये कोणतीही लक्षणे नसणे, सौम्य आणि जास्त लक्षणे असलेया मुलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली आहेत.
 2. लक्षणे नसलेल्या मुलांसाठी कोणतेही उपचार करण्याच्या सूचना नाहीत. मात्र, संभाव्य लक्षणांवर नजर ठेवावी.
 3. काही मुलांमध्ये घसा खवखवणे, वाहणारे नाक, श्वासोच्छवासासह खोकला सौम्य लक्षणे असल्यास काळजी घ्यावी. काही मुलांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्याही असू शकतात. मार्गदर्शक सूचनांनुसार अशा मुलांसाठी कोणत्याही तपासणीची शिफारस केलेली नाही. मात्र, अशा मुलांना घरी विलगीकरण कक्षात ठेऊन उपचार केले जाऊ शकतात.
 4. अशावेळी उपचारांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुलांना पॅरासिटामोल (10-15 मिलीग्राम / किलो / डोस) देऊ शकतात. दर 4 ते 6 तासांनी पुनरावृत्ती करावी.
 5. खोकला झाल्यास उकळलेले आणि कोमट केलेले पाणी पिण्याची शिफारस केली आहे.
 6. मुलांमध्ये हायड्रेशनसाठी ओरल फ्लुइडसह न्यूट्रिशन डायटची शिफारस केली जाते.
 7. सौम्य लक्षणे असलेल्या मुलांना अँटीबायोटिक्स न देण्याचा सल्ला दिला जातो.
 8. जर ऑक्सिजन संपृक्तता पातळी 90% च्या वर असेल तर ते मध्यम श्रेणीमध्ये समाविष्ट केले जाईल. सौम्य लक्षणे असलेल्या मुलांमध्ये निमोनिया होऊ शकतो. तथापि, अशा मुलांसाठी गंभीर लक्षणे दर्शविल्याशिवाय नियमित लॅब चाचण्या करण्याची शिफारस केली नाही.
 9. मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड आरोग्य केंद्र किंवा माध्यमिक स्तरीय आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध असतील अशा ठिकाणी दाखल करावे.
 10. तापासाठी पॅरासिटामॉल (10-15 मिलीग्राम / किलो / डोस) यासह बैक्टिरियल इन्फेक्शन असल्यास अमोक्सिलिन देण्याचेही म्हटलेले आहे.
 11. ऑक्सिजन संपृक्तता 94% च्या खाली आल्यास ऑक्सिजनची आवश्यकता पडू शकते.
 12. विलगीकरण कक्षात ठेवताना ऑक्सिजनची पातळी 95 वरून 94 पर्यंत कमी केली आहे.
 13. कोरोना रुग्णाची काळजी घेण्यासह सर्वांनी एन -95 मास्क वापरणे अनिवार्य असेल.
 14. कर्करोग आणि प्रत्यारोपित रुग्णांना घरी विलगीकरण कक्षात राहता येईल.
 15. कोरोना रूग्णाच्या केअर टेकरला प्रत्येक चार तास मॉनिटरींग चार्ट तयार करावा लागेल. यात तापमान, हृदय गती (पल्स ऑक्सिमीटरने मोजणे), एसपीओ 2 टक्केवारी, रुग्णाची शारीरिक भावना, लक्षणांमधील बदल आणि मानसिकता यांचा समाविष्ट आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्स वाचा : ProtocolforManagementofCovid19inthePaediatricAgeGroup.pdf (mohfw.gov.in) http://www.mohfw.gov.in/pdf/ProtocolforManagementofCovid19inthePaediatricAgeGroup.pdf

Advertisement

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply