Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : असे ओळखा कार्बाइडयुक्त आंबे; खाणे टाळा, कारण ‘हे’ होतात दुष्परिणाम

सध्या आंब्याचा सीजन आहे. यामध्ये भरपूर आंबे खाऊन वर्षभराचा गोडवा साठवायचा म्हणून अनेकजण कुटुंबियांसाठी बाजारातून अमे आणतात. मात्र, याच बाजारातील कार्बाइडयुक्त आंब्यामुळे ऐन करोना संकटात आपल्याला आजारांची लागण होऊ शकते. तसेही सध्या कोविड 19 साथीच्या कालावधीत आजारी पाडणे आणि त्यावरील उपचारासाठी लाखोंचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ही महत्वाची माहिती नक्कीच वाचा.

Advertisement

अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार कॅल्शियम कार्बाइडवर बंदी आहे. तरीही सध्या अनेक फळविक्रेते असेच आंबे आणि इतर फळ ग्राहकांना विकत आहेत. त्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. उलट अनेक ठिकाणी याच अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा चालू आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि फळ विक्रेते यांच्यावर विश्वास न ठेवता घरी पिकवलेले आंबे खावेत. त्यासाठी  कच्ची कैरी आणून घरात आढी करून त्यात नैसर्गिकरीत्या आंबे पिकवता येतात. त्यामुळे खर्चातही 40 टक्के बचतही होईल.

Advertisement

कॅल्शियम कार्बाइडयुक्त आंबे आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे यातील काही महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. कार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्ले तर घसा खवखव करणे, जिभ व तोंड येणे, कॅन्सर, किडनीचे विकार, अल्सर, डायरिया, जळजळ आदी आजार होऊ शकतात.
  2. काही ठिकाणी आंबा पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबरमध्ये इथिलिन, इथेरॉल लिक्विड आणि स्प्रेचा वापर करण्यात येत आहे.
  3. नैसर्गिक आंबा पिकण्यासाठी आठ दिवस लागतात. पिकलेला आंबा आकर्षक नसतो. गोड मनमोहक वास येतो. चव चांगली लागते.
  4. कार्बाइडने १५ तासांत गॅसच्या उष्णतेमुळे आंबा हिरव्याचा पिवळा होतो. मात्र, आतील गर पिकत नाही. तो दिसायला आकर्षक असतो. लसणासारखा वास येतो. आंबा हातात घेतला की गरम वाफ मारतो. अतिवापराने आंबे डागळतात.
  5. कॅल्शियम कार्बाइड विक्रीस बंदी आहे. असे असतानाही गैरमार्गाने ते सर्रास खरेदी-विक्री करून त्याचा वापर केला जातो.
  6. आंबा पिकवण्यासाठी छोट्या-छोट्या पुड्यांत भरून पेटीत, आंब्याच्या ढिगात ठेवतात. कार्बाइडची रासायनिक प्रक्रिया होऊन अॅसिटिलीन गॅस बाहेर पडतो. हा गॅस ११५ तासांत २०० किलो फळांतील हरितद्रव्य नष्ट करून फळाला आकर्षक पिवळा रंग आणतो. ग्राहकांची आकर्षक रंग पाहून फसगत होते.

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply