Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ क्षेत्रातील 40 लाख नोकऱ्यांवर गंडांतर; पहा नेमके काय म्हटलेय व्यापाऱ्यांनी

मुंबई :

Advertisement

देशातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत आता किमान 80 टक्के दुकाने बंद (Business Shops) आहेत. मिनी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उरल्याने कडक निर्बंध लागू आहेत. अशावेळी उघडल्या जात असलेल्या 20 टक्के दुकानातही तितकेसे ग्राहक येत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून अशी भीती व्यक्त केली गेली आहे की, जर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक (RBI / Reserve Bank of India) लवकरच मदतीसाठी पुढे नाही तर तब्बल 40 लाख नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते.

Advertisement

रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून राज्यांतील लॉकडाउन आणि कर्फ्यूसारख्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. त्याशिवाय सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजावरही (Bank Loans) सूट देण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. किरकोळ व्यवसायात मार्जिन (Retail Margin) कमी असल्याने अगोदरच मोठी कसरत करावी लागते. सध्याच्या वातावरणात तर फारच कमी उत्पन्न मिळाल्यामुळे व्याजाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत किरकोळ क्षेत्रातील सर्व कर्जात फक्त 6 टक्के व्याज आकारले जावे आणि त्यासाठी सरकारने आवश्यक त्या योजना आणल्या पाहिजेत अशी मागणी होत आहे.

Advertisement

आपत्कालीन क्रेडिट लाइन हमी योजनेची (Emergency Credit Line Guarantee Scheme) व्याप्ती किरकोळ व्यापाऱ्यांनाही देण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांपासून घेतलेल्या कर्जाचे मुद्दल व व्याजावर स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियानेही रिझर्व्ह बँकेमार्फत व्यावसायिकांना विशेष कर्जे उपलब्ध करुन दिली पाहिजेत, तसेच कार्यशील भांडवलाची व्याप्ती वाढविली पाहिजे असेही म्हटले आहे. ही कर्जे त्यांच्या मर्यादेपेक्षा 30 टक्के जास्त असली पाहिजेत. जेणेकरून कडक कर्फ्यूसारख्या परिस्थितीत कामगारांना मोबदला देणे शक्य होईल.

Advertisement

असोसिएशनचा असा अंदाज आहे की, देशातील किरकोळ क्षेत्रात सुमारे अडीच लाख कोटींची गुंतवणूक आहे. या दिशेने शासन व रिझर्व्ह बँकेकडून त्वरित मदत न मिळाल्यास 75 हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक एनपीए (NPA) होऊ शकते. एवढेच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रात थेट तीस लाख रोजगार धोक्यात येतील आणि किरकोळ क्षेत्राशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या इतर क्षेत्रातही नोकर्‍या जातील. त्यापैकी केवळ दहा लाख रोजगार कापड क्षेत्राशी संलग्न आहेत. तज्ञांच्या मते किरकोळ व्यवसाय अशा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात जे उत्पादन, मनोरंजन यासारख्या इतर मोठ्या उद्योगांशी थेट जोडलेले असते. अशा परिस्थितीत, येथे असलेल्या अडचणींचा प्रभाव संपूर्ण मूल्य शृंखलावर होईल. आणि नोकर्‍या (employment) जाणे आणि मंदीसारख्या परिस्थितीत अनेक क्षेत्राला अशावेळी फटका बसणे साहजिकच आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply