Take a fresh look at your lifestyle.

‘झोमॅटो’ची छप्पर फाड कमाई, तुम्हालाही मिळणार अशी संधी!

हॉटेलचं खाण्याची इच्छा तर आहे, पण जाता येणार नाही किंवा कधी कधी कंटाळा येतो. अशा वेळी डोळ्यासमोर एकच नाव येते.. झोमॅटो! (Zomato) तुम्हाला घरपोच जेवण देऊन ही कंपनी मालामाल झाली. अवघ्या काही दिवसात या कंपनीने आजघडीला तब्बल 4.05 लाख कोटींपर्यंत मजल मारली आहे. मात्र, आता या कंपनीने ‘इनिशियल पब्लिक ऑफर’ अर्थात ‘आयपीओ’ (share market IPO) विक्रीला काढून ग्राहकांनाही कमाईची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement

कंपनीच्या ‘आयपीओ’ संबंधित कागदपत्रांतूनच एकूण कमाईचा आकडा समोर आला आहे. झोमॅटोने प्रस्तावित ‘आयपीओ’साठी सेबीकडे कागदपत्रे (डीआरएचपी) सादर केली आहेत. त्यानुसार ‘आयपीओ’च्या माध्यमातून 8250 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. व्यवसायाचा विस्तार, तसेच जनरल कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement

मार्च 2020 मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न 2486 कोटी रुपये होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. सध्या कंपनीची वाटचाल तोट्यात सुरू आहे.

Advertisement

तुम्हाला कमाईची संधी
एखादी कंपनी शेअर बाजाराच्या (Indian Stock Market) माध्यमातून पैसे जमवण्याचा विचार करते, त्यावेळी त्या कंपनीला ‘आयपीओ’ जारी करावे लागतात. ‘आयपीओ’च्या माध्यमातून कंपनीचा मालक आपली हिस्सेदारी तुम्हाला विकतो. ‘आयपीओ’ म्हणजे काय, तर कोणतीही कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात ‘लिस्ट’ होते, त्यावेळी त्या कंपनीला काही शेअर्स जारी करावे लागतात, यालाच ‘इनिशिअल पब्लिक ऑफर’ अर्थात ‘आयपीओ’ म्हटले जाते. झोमॅटो कंपनी अशाच प्रकारे ‘आयपीओ’ जारी करणार आहे. त्यात पैसे गुंतवून तुम्हाला मोठी कमाई करता येणार आहे. आधी ‘आयपीओ’ला मंजुरी मिळेल. त्यानंतर आयपीओ ओपन होण्याची आणि बंद होण्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

Advertisement

अशी सुचली ‘झोमॅटो’ची कल्पना
झोमॅटो एक भारतीय रेस्टॉरंट एग्रीगेटर (Indian Restaurant Aggregator) आहे. कंपनीची सुरुवात 2008 मध्ये पंकज चड्ढा (Pankaj Chaddha) आणि दीपेंद्र गोयल (Deependra Goyal) यांनी केली. एके दिवशी दीपेंद्र नेहमीप्रमाणे कॅन्टिनमध्ये जेवणाची वाट पाहत होते. त्यात खूप वेळ वाया गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मेन्यूकार्ड स्कॅन करून ऑनलाईन टाकले. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचवेळी त्यांच्या डोक्यात ‘झोमॅटो’ कंपनी उभारण्याची आयडिया आली. ऑनलाईन मेनूला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे त्यांनी ‘वेबसाइट’ उघडण्याचा विचार केला. जेणेकरून लोकांना आसपासच्या रेस्टॉरंटची माहिती मिळेल. त्यांनी कार्यालयातील मित्र पंकज चढ्ढा यांना सोबत घेऊन 2008 मध्ये ‘फूडीबे’ वेबसाईट (foodiebay website) सुरु केली. त्यात रेस्टॉरंटच्या मेन्यूबाबत समीक्षा केली जात होती. झोमॅटोने प्रत्येक शहरातील रेस्टॉरंटसोबत करार केला. या रेस्टॉरंटमधून जेवणाची डिलीव्हरी (Food delivery) घरापर्यंत करण्याचे काम झोमॅटोने सुरू केले आणि काही दिवसातच ही कंपनी लोकांच्या गळ्यातील ताईत बनली.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply