Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीने ओलांडला ‘हा’ टप्पा!

मुंबई : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, दुसरीकडे आज (ता. 29) शेअर बाजारात (share market) तेजी दिसून आली. अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेने (fedral reserve bank) व्याजदर कायम ठेवल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. त्यांनी केलेल्या चौफेर खरेदीने भांडवली बाजारात तेजीची लाट आली. आज सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स (sensex) आणि निफ्टी (nifty) त मोठी वाढ झाली. सेन्सेक्स पुन्हा एकदा ५० हजारांवर गेला, तर निफ्टीने १५००० अंकांचा टप्पा ओलांडला.

Advertisement

सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला असून, तो ४९,९७१ अंकावर होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६६ अंकांच्या वाढीसह १४,९३१ अंकावर गेला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ५६७ अंकांची झेप घेतली होती. तो ५०,३०० अंकावर गेला होता. पाठोपाठ निफ्टीने १५० अंकांची वाढ नोंदवत १५,१०० अंकांपर्यंत मजल मारली.

Advertisement

बँका, वित्त संस्था, ऑटो, फार्मा क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, टीसीएस, इन्फोसिस, ऍक्सिस बँक, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज लॅब, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, आयटीसी, एनटीपीसी यांचे शेअर तेजीत होते. टायटन, एल अँड टी, टेक महिंद्रा, नेस्ले, मारुती, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, एसबीआय, कोटक बँक या शेअरमध्ये घसरण झाली.

Advertisement

दरम्यान, दुपारच्या सत्रात झालेल्या नफेखोरीने सेन्सेक्सची तेजी विरून गेली. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. कोरोनामुळे पुढील ६-८ महिन्यांपासून शेअर निर्देशांकात चढ-उतार होत आहेत. निफ्टी १४००० ते १६००० च्या दरम्यान राहील, असा अंदाज ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ (value investor)चे शेअर बाजार विश्लेषक विजय केडिया यांनी व्यक्त केला.

Advertisement

चलन बाजारात आज डॉलर (dollar)च्या तुलनेत रुपयाने चांगली कामगिरी केली. सलग तिसऱ्या सत्रात डॉलरसमोर रुपयाचे मूल्य वधारले. तो ७४.१०च्या पातळीवर गेला. बुधवारी डॉलरसमोर रुपया २६ पैशांनी वधारला होता. आज धातू क्षेत्रात विशेष खरेदी दिसून आली. वायदेपूर्ती असल्याने गुंतवणूकदारांनी चांगल्या शेअरच्या खरेदीला प्राधान्य दिले. ‘मेटल स्टॉक’ (metal stock)मध्ये जिंदाल साॅ, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, सेल , नाल्कोच्या शेअरमध्ये वाढ झाली.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply