Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून हैदराबादचा सलग चौथा पराभव; तर, चेन्नईने ७ गडी राखून सामना जिंकला

मुंबई :
आयपीएलचा २३ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने चेन्नईला कर्णधार वॉर्नर आणि मनीष पांडेच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने १७२ धावांचे लक्ष्य दिले. मात्र फाफ डुप्लेसिस आणि रुतूराजच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने चेन्नई संघाने ७ गडी राखून सामना जिंकला.

Advertisement

पहिले फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबाद संघाला पहिला धक्का सॅम करननने जॉनी बेयरस्टोच्या माध्यमातून दिला. बेअरस्टो ७ धावांवर बाद झाला. पॉवरप्लेमध्ये हैदराबाद संघाने एक विकेट गमावून ३९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान मनीष पांडेने आधी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर वॉर्नरनेही आपले ५० वे अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरने ५५ चेंडूत ५७ धावा केल्या आणि लुंगी एनडिगीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान ३ चौकार आणि ३ षटकार लगावले.

Advertisement

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. सलामीवीर गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि पॉवरप्लेमध्येच विकेट न गमावता ५० धावा केल्या. यानंतर दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला. चेन्नईच्या दोघा सलामीवीरांनी ११ षटकांत शतकीय भागीदारी केली. ही भागीदारी राशिद खानने तोडत ७५ धावांवर रुतुराज गायकवाडला बाद केले. या अर्धशतकीय डावात रुतुराजने १२ चौकार ठोकले.

Advertisement

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मोईन अलीला रशीद खानने बाद केले व संघाला दुसरे यश मिळवून दिले. मोईन अलीने ८ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर राशिद खानने डुप्लेसिसला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. डुप्लेसिसने ३८ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. अखेर जडेजाच्या ७ आणि रैनाच्या १७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला ७ विकेटने पराभूत केले. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply