Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हून पॉन्टिंग म्हणाला की, ‘……आम्ही भाग्यवान आहोत..!’

मुंबई :
भारताकडून उड्डाणे रद्द केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतण्याविषयी घाबरले आहेत. या प्रकरणात दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी आपले मौन सोडले असून ते म्हणाले की, कोविड साथीच्या आजारामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बायो बबलच्या बाहेरची जी परिस्थिती आहे ते पाहता आमची समस्या ही खूप छोटी आहे.

Advertisement

भारतातील कोविडच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने मंगळवारी १५ मे पर्यंत भारताकडून येणारी प्रवासी उड्डाणे रद्द केली आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हे स्पष्ट केले की आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वत:ची व्यवस्था करावी लागेल.

Advertisement

याबाबत पॉन्टिंग म्हणाले की, भारतातून मायदेशी परतण्याचा प्रश्न असून आमच्या सरकारने काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे काही अडथळे आहेत यात काही शंका नाही, परंतु आमचा आणि इतर ऑस्ट्रेलियन नागरिकांचा प्रवास ही एक किरकोळ बाब आहे. आम्ही दररोज बाह्य परिस्थितीबद्दल विचार करत असतो. आम्हाला माहित आहे की आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला खेळण्याची संधी मिळत आहे. आशा आहे की आयपीएल क्रिकेट पाहून लोकांचे मनोरंजन होईल.

Advertisement

विशेष म्हणजे कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे, तर मुंबई इंडियन्सचा फलंदाज ख्रिस लिनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला असे म्हटले आहे की, स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना घरी परतण्यासाठी खास विमानाची व्यवस्था करावी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने असे आश्वासन दिले आहे की स्पर्धा संपल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply