Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून सीएसकेचा रॉबिन उथप्पा खेळणार थेट राजस्थान रॉयल्सकडूनच..!

मुंबई :
चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू राजस्थान रॉयल्सकडून सामना खेळणार. ऐकून थोडं नवल वाटतंय ना…पण होय, तुम्ही जे ऐकले ते खरे आहे. हे कसे शक्य होणार आहे आणि त्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेवू यात. राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या खूप अडचणीत आला आहे. कारण या संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे तर काही कोरोनाच्या भितीमुळे संघ सोडून गेले आहेत.

Advertisement

राजस्थानला पहिला फटका वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या दुखापतीमुळे झाला. जोफ्राच्या बोटाची शस्त्रक्रिया झाली. पहिले असा अंदाज व्यक्त करण्यात आला की, तो केवळ सलामीच्या सामन्यांतून बाहेर जाईल. पण त्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दरम्यान, बेन स्टोक्सही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला. लियोन लिव्हिन्गस्टोनने कोरोना बायोबॅबलमुळे अडचणीत सापडल्यानंतर आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. आता राजस्थान संघात फक्त ४ परदेशी खेळाडू बाकी आहेत. जोस बटलर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजुर रहमान.

Advertisement

संघाची ही परिस्थीती पाहता राजस्थान रॉयल्सने काही फ्रँचायझींकडे संपर्क साधून आपल्या खेळाडूंना कर्ज स्वरुपात देण्याची विनंती केली आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीशी संपर्क साधला आहे. पण कोणत्याही परदेशी खेळाडूसाठी नाही तर देशांतर्गत खेळाडू रॉबिन उथप्पासाठी. उथप्पाने या हंगामात आतापर्यंत सीएसकेसाठी एकही सामना खेळलेला नाही.

Advertisement

रॉबिन उथप्पा मागील सत्रात म्हणजेच आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सचा एक भाग होता. पण, चेन्नईने यावेळी लिलावात त्याला आपल्याकडे घेतले. उथप्पाने मागील मोसमात राजस्थानकडून १२ डावांमध्ये १९६ धावा केल्या होत्या. यंदा त्याला चेन्नईकडून अद्याप संधी मिळाली नसल्यामुळे  राजस्थान त्याच्यासाठी आग्रही आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply