Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून न्यूझीलंडचे खेळाडू जाणार भारतीय खेळाडूंसोबत इंग्लंडला

मुंबई :
आयपीएलमध्ये खेळणारे न्यूझीलंडचे क्रिकेटपटू जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय क्रिकेटपटूंसमवेत इंग्लंडला जाऊ शकतात. कारण कडक क्वारंटाईन नियमांमुळे त्यांना मायदेशी परत जाणे शक्य नाही. केन विल्यमसन, ट्रेंट बाउल्ट, काईल जेमीसन आणि मिशेल सॅटनर हे आयपीएल खेळणारे न्युझीलंड संघातील खेळाडू असून ते २ जूनपासून इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत खेळणार आहेत.

Advertisement

न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे चीफ एक्झिक्युटिव्ह हीथ मिल्स म्हणाले की, ते घरी येवू शकत नाहीत, कारण त्यांना दोन आठवड्यांपर्यंत क्वारंटाईन रहावे लागेल. आयपीएल संपल्यानंतर जास्त उड्डाणे नसल्यास परत येणे शक्य होणार नाही. आम्ही बीसीसीआय आणि आयसीसीच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, आयपीएल खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना भारताकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत चिंता आहे, त्यामुळे घरी परत येण्याचे संकेत कोणी दिले नाहीत. ११ एप्रिल रोजी ही उड्डाणे रद्द करण्यात आली होती जी बुधवारी रात्रीपासून पुन्हा सुरू होतील. मिल्स म्हणाले की, आयपीएलच्या बायो बबलमध्ये खेळाडूंना सुरक्षित वाटत आहे. हॉटेलमध्ये चार संघ असतात आणि हॉटेल म्हणजे लॉकडाउन. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना त्यांना धोका आहे परंतु सुरक्षा प्रोटोकॉलचा संपूर्ण पाठपुरावा केला जात आहे आणि ते पूर्णपणे सुरक्षित बबलमध्ये असल्याचे म्हणाले.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply