Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : पहा कमिन्सच्या मदतीबद्दल काय प्रतिक्रिया दिली जुही आणि राहुल बोसने

मुंबई :
संपूर्ण देश कोरोना साथीविरूद्ध लढा देत आहे आणि अशा परिस्थितीत बरेच जण मदतीसाठी पुढे येत आहेत. अलीकडेच बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यप, किरण खेर यांनी लोकांना मदत करण्यासाठी हातभार लावला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही मदत केली आहे, परंतु अभिनेत्री जुही चावला आणि अभिनेता राहुल बोस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

पॅट कमिन्स याने म्हटले आहे की, भारत हा देश मला सर्वाधिक आवडतो. इथले लोक अतिशय दयाळू आहेत आणि मी त्यांना दुखी पाहू शकत नाही. पुढे आयपीएलवर बोलताना म्हटले की, देशातील परिस्थिती एवढी वाईट आहे, अशावेळी आयपीएल खेळणे योग्य आहे काय? परंतु या प्रकरणात मला सल्ला देण्यात आला आहे की आयपीएल चालू आहे जेणेकरुन लोक या कठीण काळात दररोज काही तासांचा आनंद आणि आराम मिळवू शकतील.

Advertisement

त्याने पुढे म्हटले की,  पीएम केअर फंडात भारतातील रूग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा खरेदी करण्यासाठी हातभार लावला आहे आणि आयपीएलच्या माझ्या इतर खेळाडूंनाही मी अशी विनंती करतो. मी ५० हजार डॉलर्सची मदत देत आहे. पॅट पुढे म्हणतो, मला आशा आहे की या मदतीमुळे लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करता येईल. मला माहित आहे की माझी मदत खूप मोठी नाही आणि ती द्यायला उशीरही झाला असेल परंतु मला आशा आहे की यामुळे एखाद्याला तरी मदत होवू शकेल.

Advertisement

याबाबत अभिनेता राहुल बोस याने प्रतिक्रिया दिली आहे, तो म्हणाला की, एकही चेंडू न फेकता क्रमवारीत अशाप्रकारे पहिल्या क्रमांकावर पोहोचता येते. पॅट कमिन्स याला सलाम. त्याचवेळी अभिनेत्री जूही चावला हिनेही पॅटचे कौतुक करत म्हटले आहे की, पॅट कमिन्सच्या या योगदानाबद्दल आमच्या केकेआर टीमला अभिमान आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply