Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : जेव्हा धोनीने सोपा कॅच सोडला, त्यावेळी दिपकने दिली ‘अशी’ प्रतिकिया

मुंबई :
आयपीएल २०२१ च्या २३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून १७१ धावा केल्या. या सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सहज आणि सोपा कॅच सोडला अन तेव्हा बॉलरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Advertisement

Aditya Das on Twitter: “https://t.co/WgVDTlQ8WP” / Twitter

Advertisement

दीपक चहर या सामन्याचे पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. चहरच्या दुसऱ्या बॉलवर हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागून विकेटच्या मागे गेला. धोनीला हा कॅच घेणे सोपे वाटले पण पण जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपरपैकी एक असलेल्या धोनीने हा साधा कॅच सोडला.

Advertisement

धोनीने बेयरस्टोचा झेल सोडताच दीपक चहर निराश झाला. मात्र त्याने धोनीला काहीच म्हटले नाही आणि चहर थोडासा हसला आणि तो परत माघारी गेला. धोनीने कॅच सोडल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply