Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : आणि डेव्हीड वॉर्नरने केले ‘ते’ महत्वाचे लक्ष्य पूर्ण..!

मुंबई :
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा २३ वा सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात एक मोठा विक्रम नोंदविला आहे. वॉर्नरने टी २० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Advertisement

वॉर्नर असा पराक्रम करणारा जगातील चौथा खेळाडू आहे. यापुर्वी ख्रिस गेल, किरोन पोलार्ड आणि शोएब मलिक यांनी ही कामगिरी केली आहे. ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक १३ हजार ८३९ धावा आहेत. त्यानंतर पोलार्डने १० हजार ६९४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर शोएब मलिकने १० हजार ४८८ धावा केल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये आता डेव्हिड वॉर्नरच्या १० हजार १७ धावा आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावावर ५० अर्धशतकांची नोंद करण्यात आली आहे. त्याने १४८ सामन्यात हा विक्रम केला आहे.

Advertisement

वॉर्नरने आयपीएलमध्ये ५ हजार ४४७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आहेत. याशिवाय वॉर्नरने आयपीएलमध्ये २०० षटकारही ठोकले आहेत. असे करणारा तो चौथा परदेशी खेळाडू आहे. त्याच्याशिवाय ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि किरॉन पोलार्ड या यादीत आहेत. आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान डेव्हिड वॉर्नरला आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply