Take a fresh look at your lifestyle.

वाचा नियमावली : १५ मेपर्यंत ब्रेक द चेन; घरी रहा, सुरक्षित रहा अन काळजी घ्या

राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध  लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Advertisement

महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी  ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.

Advertisement

महाराष्ट्र राज्यात कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.

Advertisement

साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये दिनांक १३ एप्रिल २०२१ व दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन (साखळी तोडा) आदेशातील सर्व निर्बंध त्यामध्ये केलेल्या सुधारणा, दुरुस्त्या व स्पष्टीकरणाच्यासह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक  १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply