Take a fresh look at your lifestyle.

‘चला लस घ्यायला, व्हायरस घरी आणायला…’; पहा नेमके काय होतेय केंद्रावर आणि वाढतोय धोकाही

अहमदनगर :

Advertisement

करोना लस घेऊन कोविड 19 आजारापासून आपल्याला नक्कीच संरक्षण मिळू शकते. मात्र, लस देणाऱ्या केंद्रावरील एकूण गोंधळ आणि अनागोंदी हीच आता एक मोठी डोकेदुखी बनली आहे. कारण अशा केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यासाठीचे काहीही नियोजन नसल्याने येथूनच मोठ्या प्रमाणावर करोना स्प्रेड होण्याचा धोका निर्माण होत असल्याची शक्यता आहे. रांगेत उभे राहून लस देण्याचे आणि घेण्याचे भान सगळ्यांनी सोडले आहे.

Advertisement

(1) Vijaysinh Holam on Twitter: “चला लस घ्यायला, व्हायरस घरी आणायला…! अहमदनगर शहरातील सावेडीच्या टीव्ही सेंटर येथील लसीकरण केंद्रावरील हे दृष्य. प्रशासनाच्या नियोजनाचा आभाव नागरिकांचा सयंम संपवून शिस्त मोडण्यास भाग पाडतो. किती जणांना पहिल्या खेपेतच लस मिळेल हे सांगता येत नाही, मात्र संसर्गाचा धोका वाढतो. https://t.co/1axqF9vO3D” / Twitter

Advertisement

अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी याप्रकरणी सर्वांचे लक्ष वेधणारा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवर त्यांनी हा व्हिडिओ टाकून म्हटले आहे की, चला लस घ्यायला, व्हायरस घरी आणायला…! अहमदनगर शहरातील सावेडीच्या टीव्ही सेंटर येथील लसीकरण केंद्रावरील हे दृष्य. प्रशासनाच्या नियोजनाचा आभाव नागरिकांचा सयंम संपवून शिस्त मोडण्यास भाग पाडतो. किती जणांना पहिल्या खेपेतच लस मिळेल हे सांगता येत नाही, मात्र संसर्गाचा धोका वाढतो.

Advertisement

सावेडी भागातील टीव्ही सेंटर भागातील हा व्हिडिओ फ़क़्त 52 सेकंदाचा आहे. मात्र, यामध्ये उसळलेली बेफाम गर्दी आणि गोंधळ हा एकूणच करोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासन आणि जनता यांनी दीड वर्षात काहीही शिकून घेतले नसल्याचे दाखवणारे चित्र आहे. इथे एकमेकांना रेटारेटी करून करोना लस घेण्याचे दिव्य दणक्यात पार पाडले जात आहे. एकूणच करोना लस घ्यायला जायचे आणि बरोबर विषाणू घेऊन यायचे असाच हा प्रकार आहे. यावर जिल्हा प्रशासन कधी ठोस कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply