Take a fresh look at your lifestyle.

येतोय की 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरावाला स्लिम फोन; पहा नेमकी किती आहे किंमत

मोबाईल हा फ़क़्त बोलण्यासाठी नाही तर स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याचे एक महत्वाचे साधन बनलेले आहे. त्यामुळेच सेल्फी कॅमेरा हे फिचर कोणत्याही मोबाईलचे एक महत्वाचा भाग बनलेले आहे. आता विवो कंपनीने तब्बल 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरावाला फोन भारतात आणला आहे. दि. 6 मे 2021 पासून हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Advertisement

स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवोने आज भारतात व्हिवो व्ही 21 (Vivo V21 Mobile Smartphone) लाँच केला आहे. हा भारतातील सर्वात पातळ (स्लिम) स्मार्टफोन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासह विवोचा हा फोन जगातील पहिला 44 एमपी ओआयएस सेल्फी कॅमेरासह देखील आहे. हा फोन नाईट सेल्फी, सुपर स्थिर सेल्फी व्हिडिओ, आय ऑटोफोकस, 4 के व्हिडिओ बनविणार्‍या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्कृष्ट फोन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यासह स्पॉटलाइट सेल्फी वैशिष्ट्य आपल्याला समोरच्या कॅमेऱ्यातून उत्कृष्ट चित्रे घेण्यात मदत करेल. तर मग या फोनची किंमत आणि सर्व वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया की.

Advertisement
 1. इथे भेटणार फोन : फ्लिपकार्ट, वीवो इंडिया ई-स्टोर आणि रिटेल स्टोर्स
 2. 8GB + 128GB याची किंमत असेल 29,990 रुपये
 3. तर, 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंट याची किंमत असेल 32,990 रुपये
 4. HDFC कार्डवर खरेदी केल्यास मिळणार 2,000 रुपये कॅशबॅक
 5. 6.44 इंच एमोलेड डिस्प्ले
 6. स्क्रीन रिफ्रेश्ड रेट 90Hz
 7. HDR10+ सपोर्ट आणि Mediatek Dimensity 800U चिपसेट
 8. 4000mAh बॅटरी
 9. प्राइमरी कॅमेरा 64MP आणि 120 डिग्री वाइड एंगल
 10. एंड्राइड 11 बेस्ड Funtouch OS
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply