Take a fresh look at your lifestyle.

हवामान अंदाज : काळजी घ्या बाबांनो, कारण ‘त्या’ भागात होणार आहे जोरदार पाऊस

पुणे :

Advertisement

ऐन करोना संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागाला आता अवकाळी पावसाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. सध्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी हवामान विभागाने आपला अंदाज प्रसिद्ध केलेला आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Advertisement

हवामान खात्याने राज्यात पुढील चार दिवसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार मुंबई व पालघरमध्ये पाऊस पडणार नाही. परंतु, 2 मेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. 2 मे पर्यंत पुण्यासह महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात हवामान अधिक खराब होऊ शकते, असे सॅटेलाइट प्रतिमांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

आयएमडीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान हवामान खराब होण्याची शक्यता आहे. सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज असून या भागासाठी केशरी रंगाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजेच पुढील चार दिवस या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातही 2 मे रोजी जोरदार तर, बाकीचे इतर दिवस किरकोळ पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply