Take a fresh look at your lifestyle.

वाझेप्रकरणातील माने यांचे शिवसेना कनेक्शन चेक करा; भाजपने केली एनआयएकडे ‘ही’ मागणी

मुंबई :

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकेयुक्त कार ठेवणे आणि नंतर याप्रकरणी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशीसुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी एनआयए महासंचालकांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

Advertisement

मनसुख हिरेन यांना पोलीस  अधिकारी तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्याकरणी अटक करण्यात आलेले सुनील माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता, त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता. 

Advertisement

तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्ज मिळाली त्यांच्याशी सुद्धा सुनील माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध, और पाणी का पाणी’ होण्याची आवश्यकता असल्यानेच आज एनआयएला पत्र लिहून मी ही मागणी केली असल्याचे आमदार भातखळकर म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply