Take a fresh look at your lifestyle.

म्हणून श्रीलंकेच्या ‘त्या’ क्रिकेट खेळाडूवर सहा वर्षांची बंदी..!

मुंबई :
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू नुवान झोयसा याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये झोयसाला लाचलुचपत प्रतिबंधक संहिता अंतर्गत तीन गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणात त्याने स्वतंत्र न्याय प्राधिकरणासमोर सुनावणीचे आवाहन केले होते ते फेटाळून लावण्यात आले.

Advertisement

श्रीलंका संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या झोयसाला युएईमध्ये टी २० लीग दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मे २०१९ मध्ये तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.श्रीलंकेकडून ३० कसोटी आणि ९५ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या झोयसाला सप्टेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. श्रीलंका क्रिकेटच्या हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये तो काम करायचा ज्यामुळे त्याला सध्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संपर्क साधण्याची संधी मिळाली.  नोव्हेंबर २०२० मध्ये झोयसाला लाचलुचपत प्रतिबंधक संहिता अंतर्गत तीन गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्यात आले होते व त्याचे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते. त्याच्यावर अखेर सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply