Take a fresh look at your lifestyle.

एमडी, सीईओंच्या बत्त्या गुल होणार; ‘RBI’ने घेतलाय महत्वपूर्ण तो निर्णय..!

मुंबई :

Advertisement

एखादी बँक असो वा संस्था, वर्षानुवर्षे एकच अधिकारी वा संचालक ‘गुळाला मुंगळा चिकटून बसावा..’ तसे पदाला चिकटून बसलेले असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा, लायकी असतानाही संधी मिळत नाही. बरं… त्या पदावर बसल्यावर काम करावं, तर तेही नाही.. फक्त जागा अडवून बसायचे.. आपण काही काम करायचे नाही आणि कोणाला करूही द्यायचं नाही.. या अशा प्रवृत्तीमुळे नुकसान मात्र संस्थेचेच होते. मात्र, ‘आरबीआय’ने (RBI / रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) आता अशा लोकांसाठी खास नियम तयार केला आहे. त्यामुळे ठराविक काळानंतर त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे.. काय आहे हा नवा नियम, चला तर पाहू..

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) भारतीय बँकिंग क्षेत्रासंदर्भात एक नवीन नियम जारी केला आहे. ‘आरबीआय’ची मार्गदर्शक तत्वे खासगी बँका (Private Bank) असो वा लघु वित्तीय बँक (Micro Finance Banks), परदेशी बँकांच्या सहाय्यक कंपन्यांना लागू असतात. मात्र, एखादी परदेशी बँक भारतात शाखा चालवत असेल, तर त्यांना हे परिपत्रक लागू होणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार, आता व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि होल टाईम डायरेक्टर पदांवरील व्यक्तीला 15 वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच पदावर राहता येणार नाही.

Advertisement

‘मिंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात असे म्हटले आहे, की एमडी (व्यवस्थापकीय संचालक), सीईओ आणि डब्ल्यूटीडीने 15 वर्षे पूर्ण केल्यावर त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागेल. बँकेचे बोर्डाने निर्णय घेतला, तरच त्यांची परत नियुक्ती शक्य होईल. मात्र, बँकेच्या बोर्डानेही तसा निर्णय घेतला, तरी कमीत कमी 3 वर्षांनंतरच त्यांची पुन्हा नियुक्ती होईल. या तीन वर्षांत संबंधित व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे बँकेशी संपर्कात राहू शकत नाही.

Advertisement

खासगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे कायम ठेवली आहे. तथापि, बँकेचे संचालक मंडळ यासंदर्भात निर्णय घेण्यास मोकळे असतील. बँकेचे बोर्ड सेवानिवृत्तीसाठी वयाची मर्यादा कमी करू शकते. तथापि, ही मर्यादा 70 वर्षांपेक्षा जास्त करण्याचा अधिकार त्यांना नाही.

Advertisement

मॅनेजिंग डायरेक्टर किंवा होल टाईम डायरेक्टर (WTD) बँकेचा प्रवर्तक किंवा मोठा भागधारक असेल, तर तो या पदावर 12 वर्षांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. गंभीर परिस्थितीत त्यांचा कार्यकाळ 15 वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. एखाद्या खासगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक किंवा डब्ल्यूटीडी यांनी आधीपासून 12 किंवा 15 वर्षे मुदत पूर्ण केली असेल, तर ते आरबीआयकडे अप्रूव्ड टर्मसाठी पदावर राहू शकतात.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply