Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून सुनिल गावस्करांनी आरसीबीला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

मुंबई :
आयपीएल २०२१ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास खूपच रमणीय झाला असून मंगळवारी खेळलेल्या सामन्यात आरसीबीने थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटलचा १ धावेने पराभव केला. बंगळुरूकडून एबी डिव्हिलियर्सने नाबाद ७५ धावा फलंदाजी करत शानदार फलंदाजी केली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी आरसीबीला एबी डिव्हिलियर्सबाबत एक सल्ला दिला असून त्याला ओपनिंग करण्याची संधी दिली पाहिजे असे म्हटले आहे, यामुळे त्याला २० षटके खेळण्याची संधी मिळेल. मंगळवारी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा सहावा फलंदाज ठरला.

Advertisement

सुनील गावस्कर यांनी दिल्लीविरुद्धच्या सामन्याबद्दल एबी डिव्हिलियर्सचे कौतुक केले. ते म्हणाले, तो अप्रतिम खेळाडू आहे. गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की, तो जादूगार आहे आणि तो आपल्या खेळामुळे आपल्याला आनंदित करतो. तो असे फटके खेळतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांनी आरसीबीला सल्ला दिला की एबी डिव्हिलियर्सला सलामीला खेळण्याची संधी द्यावी जेणेकरून संपूर्ण २० षटके खेळण्याची संधी त्याला मिळू शकेल. जर तुमच्याकडे असा फलंदाज असेल तर तुम्ही त्याला दहाव्या किंवा अकराव्या षटकात फलंदाजीसाठी पाठवण्यापेक्षा २० षटके खेळू द्या, असे ते म्हणाले.

Advertisement

गावस्कर यांनी या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने खेळलेल्या त्याच्या आवडत्या शॉट्सचे वर्णन केले. थर्ड मॅनवर खेळला जाणारा त्याचा शॉट गावसकर यांना खूप आवडतो. दरम्यान, बंगळुरूने मंगळवारी २० षटकांत ५ गडी बाद १७१ धावा केल्या. संघासाठी एबी डिव्हिलियर्सने अवघ्या ४२ चेंडूत ७५ धावांची शानदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटलने ऋषभ पंत (नाबाद ५८) आणि शिमरॉन हेटमीयर (नाबाद ५३) यांच्या खेळीनंतरही १ रनने सामना गमावला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply