Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : दुसऱ्या लाटेमुळे सामन्यांवर बंदीची मागणी; पहा नेमके काय म्हटलेय मिटकरी यांनी

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात करोना विषाणूची दुसरी लाट जोमात आहे. अशावेळी निवडणुकीचा हंगाम संपत आल्याने काळजी घेऊन करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होने आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी इंडियन प्रीमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा जोमात आहे. यातील अनेक खेळाडूंना करोना विषाणूची लागण झालेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, मॅचेसवर केंद्र सरकारने बंदी आणावी. कोरोना सारख्या महामारीच्या काळात IPL च्या मॅचेस कशासाठी व कोणासाठी?? तात्काळ मॅचेस वर बंदी आणायला हवी,आणि जनतेच्या जीवावर श्रीमंत होणाऱ्या क्रिकेटच्या खेळाडूंनी आपला खजिना गोरगरिबांसाठी खुला करायला हवा.

Advertisement

त्यावर विजय पोटे यांनी म्हटलेय की, देशातील जनता घरात बसून ipl बघतेय तर बघू द्या. Ipl बंद केले तर लोक कंटाळा आला म्हणून घराबाहेर पडतील. विनाकारण पोलिसांना व प्रशासनाला त्रास होईल. तर, प्रशांत सुखदेवे लिहितात की, कित्तेक लोकांच मन कोरोना पासून क्रिकेट कड़े वळल असेल तर, योग्यच आहे… उठल-सुठल कोरोना बघत बसन हे ही अयोग्यच. नितीन नामदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की, अहो साहेब त्यानं त्यांच्या चुली बंद पडतील कशाला त्यांच्या पोटावर पाय देताय. कोरोना काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. खूप गरिबीतून आलेत सर्वजण.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply