Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : अशा पद्धतीने बाजार समितीत सुरू होऊ शकेल कोविड केअर सेंटर

पुणे :

Advertisement

राज्यात  कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने रूग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे महाकठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा याची गरज वाढली आहे. अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध करून देण्यास आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही परवानगी मिळाली आहे.

Advertisement

बाजार समिती कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामधील नियम आणि महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५% रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
  • यासाठी  रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी  देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले असून रुपये १० लाखाच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक यांना देण्यात आले आहेत.
  • कोविड केअर सेंटर (Covid Care Center) हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे.
  • सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून Oxygen Concentrator तथा Oxygen Cylinder, बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा.
  • तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नाष्टा व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी.
  • कोविड केअर सेंटर (Covid Care Center) चालविताना राज्य शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील.
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply