Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सोन्याची झळाळी उतरली; चांदीच्या भावातही झालीय इतकी घसरण.!

पुणे :

Advertisement

कोरोना संकटामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरु असल्याने कोरोना नियंत्रणाबाबत आशेचे किरण निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरात दिसून येत आहे.

Advertisement

कमॉडिटी बाजारातील अनिश्चिततेने आज सोने-चांदीला (Gold & Silver Market News) फटका बसला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने सोने ३०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७ हजारांखाली आले होते. सलग पाचव्या सत्रात सोने दरात आज घसरण झाली. पाच सत्रात सोने १३०० रुपयांनी स्वस्त झाले. ‘मल्टी कमॉडिटी एक्सचेंज’वर आज (बुधवारी) सोन्याचा भाव ४६,९८३ रुपये असून, त्यात ३०८ रुपयांची घसरण झाली. ‘एमसीएक्स’वर चांदीचा भाव ६७,८८१ रुपये किलो असून, त्यात १०५८ रुपयांची घसरण झाली.

Advertisement

‘गुड रिटर्न्स’ वेबसाईटनुसार आज (बुधवारी) मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,७९० रुपये, तर २४ कॅरेटचा भाव ४५,७९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५,९९० रुपये झाला. २४ कॅरेट सोन्यासाठी ५०,१७० रुपये प्रति १० ग्रॅमसाठी मोजावे लागत होते. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४,६४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,७०० रुपये होता. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६,७४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,४४० रुपये होता.

Advertisement

जागतिक कमॉडिटी बाजारातही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव १७६७.७६ डॉलर प्रती औंस झाला. त्यात ०.५ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २६.२५ डॉलर होता. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते, आणखी काही काळ ‘स्पॉट गोल्ड’चा भाव १७६० डॉलरवर राहील.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply