Take a fresh look at your lifestyle.

आणि सीताफळाच्या अनुदानासाठी लाच घेणारा कृषी सहायक झाला चतुर्भुज..!

औरंगाबाद :

Advertisement

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाच्या जीवावर फ़क़्त आडते आणि व्यापारी नाही तर मार्केट कमिटीचे संचालक गबर झालेले आहेत. मार्केट कमिट्या या शेतकऱ्यांना लुबाडण्याचा अड्डा बनलेल्या आहेत. तर, खासगी बाजारात शेतकरी जगजाहीर लुबाडला जात आहे. अशावेळी शेतकऱ्यांना जागवण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागानेही आपले हात यात लाल-पिवळे केले आहेत. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या एका कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी चतुर्भुज केले आहे.

Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील जांभाळा येथील कृषी सहायक रविंद्र वांडेकर यांनी सरकारने मंजूर केलेल्या अनुदानाचा मोबदला म्हणून तब्बल १ लाख ४५ हजार रुपये लाच मागितली होती. शेतकऱ्याने या अन्यायाविरोधात थेट अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली आणि मग ही कारवाई करण्यात आली. रविंद्र वांडेकर असे लाचखोर कृषी सहायकाचे तर, किशोर कांडेकर असे त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दोघांनाही अ‍ॅन्टी करप्शनने ताब्यात घेतले आहे.

Advertisement

एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलिस अंमलदार बाळासाहेब राठोड, अशोक नागरगोजे, रविंद्र काळे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply