Take a fresh look at your lifestyle.

म्हणून डॉ. सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले; तर अजित पवार यांनी म्हटलेय ‘असे’..!

अहमदनगर :
नगर जिल्ह्यात विशेष विमानाने रेमडीसीव्हर औषधे आणल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना चांगलेच फटकारले.. तसेच औषधांचा सर्व साठा तात्काळ  आरोग्य विभागाकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. विखे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Advertisement

खासदार डॉ. विखे यांनी विशेष विमानाने रेमडीसीव्हर औषधाचा साठा शिर्डी विमानतळावर उतरवला होता. त्यातील प्रत्येकी १०० इंजेक्शन शिर्डीचे साईबाबा रुग्णालय आणि जिल्हा रुगालयास दिला होता. राजकारण व श्रेयासाठी तर गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. सरकार कारवाई करील म्हणून गोपनीयता पाळली, असे डॉ. विखे यांनी व्हिडिओत म्हटले होते.

Advertisement

विखे यांच्या या कृत्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होत होती. एकीकडे रेमडीसीव्हरचा तुडवडा जाणवत असताना, डॉ. विखे यांनी ही औषधे कुठून आणली, असा सवाल उपस्थित होत होता. याबाबत काहींनी औरंगाबाद खंडपीठात विखे यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. खंडपीठाने विखे यांना फटकारताना, तात्काळ औषधांचा साठा आरोग्य विभागाकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे.

Advertisement

दरम्यान, न्यायालयाने फटकारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. विखे यांचे कान टोचले आहेत. अजित पवार म्हणाले, की “तुम्ही लोकप्रातिनिधी असला, तरी अशा प्रकारे रेमडीसीव्हरचा साठा करणे चुकीचे आहे. तुम्ही आणलेले साहित्य कोणत्या कंपनीचे आहे, त्याची तपासणी झाली आहे का, त्याला मान्यता दिली आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.”

Advertisement

पवार म्हणाले, “मधल्या काळात ओळखीमुळे काहींनी शरद पवार यांनाही काहींनी औषधे देऊ केली होती. मात्र, पुण्याची औषधे जिल्हाधीकाऱ्यांना द्या, मुंबईचे द्यायचे असतील तर आयुक्तांकडे द्या, असे पवार यांनी सांगितले होते. विखे यांच्या विमानातील व्हिडीओ आणि फोटोचा कोणीही अतिरेक करू नये. लोकप्रतिनिधीने सर्व गोष्टीची शहानिशा करूनच काम केले पाहिजे.”

Advertisement

उदाहरण सुजय विखे यांचे असले तरी, सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधीनी या महामारीच्या संकटात सामंजस्याने वागले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला आहे. दरम्यान, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही विखे यांच्यावर टीका केली होती.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply