Take a fresh look at your lifestyle.

म्हणून विकास निधी थेट कोविड उपचारासाठी वापरावा; रवींद्र बारस्कर यांनी दिले मनपाला पत्र

अहमदनगर :

Advertisement

वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे शहरातील नागरिकांना आरोग्‍याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशावेळी आरोग्य आरोग्‍य यंत्रणा सक्षम करण्‍याला प्राधान्‍य देणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर विकास कामापेक्षा सध्‍या नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सभागृह नेते रविंद्र बारस्‍कर यांनी पुढाकार घेतला आहे. शहर विकास  निधीतून त्यांनी 10 लाख रुपयांचा निधी  कोवीड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी घेण्याचे पत्र आयुक्‍त शंकर गोरे यांना दिले आहे.

Advertisement

याबाबत माहिती देताना बारस्कर यांनी पत्रात म्‍हटले आहे की, शहरामध्‍ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असून रूग्‍णांची संख्‍याही वेगाने वाढत आहे. मनपा आरोग्‍य विभागाच्‍यावतीने कोरोना रूग्‍णांना योग्‍य ते उपचार मिळण्‍याच्‍या दृष्टिने सर्वतोपरी प्रयत्‍न सुरू आहेत. मात्र, कोवीडच्‍या रूग्‍णांना आवश्‍यक असणारी साधन सामुग्री, औषधोपचार अशा बाबीसाठी निधीची आवश्‍यकता भासते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्टिने फक्‍त कोवीड रूग्‍णांसाठी व कामासाठी या निधीचा वापर करावा करावी.

Advertisement

बारस्कर यांनी असे पत्र देताना यावेळी सावेडी भाजपा मंडल अध्‍यक्ष सतिष शिंदे, अमित गटणे, बाबासाहेब भिंगारदिवे आदी उपस्थित होते. शहरातील करोना रुग्णांना सुविधा आणि योग्य औषधोपचार मिळण्यासाठी विकास कामाचा निधी थेट आरोग्याच्या घटकावर खर्च करण्याचे पत्र खूप महत्वाचे आहे. त्यामुळे अनेकांनी बारस्कर यांच्या या पत्र देण्याचे आणि भावनेचे कौतुक केले आहे. इतरांनीही असाच पुढाकार घेऊन नगर शहरात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी मदत करण्याची मागणी होण्यास सुरुवात झाली आहे. 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply