Take a fresh look at your lifestyle.

फिकर नॉट : बंद पडलेल्या बँक खात्यात पैसे अडकलेत, तर अशी काढा शिल्लक रक्कम

पुणे :
आपल्यापैकी अनेकांची विविध बँकेत खाती (Bank account) असतील. मात्र, बऱ्याचदा काही खात्यात वर्षानुवर्षे कोणताच व्यवहार होत नाही. अशी खाती थंड बस्त्यात पडतात. त्यातील काही बचतीची, तर काही चालू खाती असतात. बऱ्याच दिवसात काहीही व्यवहार झालेला नसल्याने अशी खाती बँकेकडून निष्क्रिय म्हणून जाहीर केली जातात. काही वेळा तुमची रक्कमही अशा खात्यात अडकून पडते. मग अशा खात्यातून पैसे कसे काढावे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर काळजी करू नका. जास्त काळ न वापरलेले खाते निष्क्रिय होत असले, तरी तुमचे पैसे बुडत नाहीत. तुमचेही पैसे असे अडकून पडले असतील, तर ते कसे काढायचे, याबाबत समजून घेऊ या..

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशी ज्यांच्यात दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, ती खाती निष्क्रिय केली जातात, परंतु जर त्यामध्ये ग्राहकांकडे पैसे असतील, तर ते काढू शकतात. फेब्रुवारी-2021 मध्ये अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार अशा निष्क्रिय बँक खात्यांत सुमारे 35 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे शिल्लक आहेत. ज्यावर कोणीही दावा केलेला नाही, त्यांना हक्क न केलेल्या ठेवी (Unclaimed Deposits) म्हणतात.

Advertisement

अशा प्रकारे मिळवा पैसे!
बँकिंग तज्ज्ञ जितेश श्रीवास म्हणतात, की अनेक बँकामध्ये काहींच्या 500 ते 1000 रुपयांच्या ठेवी आहेत, परंतु बँकेने अनेक शुल्क लावून पैसे कपात केली असावी, असा विचार करून अनेक जण ते काढत नाहीत. काही खात्यांमध्येच किमान रक्कम बँकेत ठेवणे बंधनकारक आहे. किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक नसल्यास आपण कधीही आपले पैसे काढू शकतो. इतकेच नाही, तर व्याजासह बँक आपले पैसे परत करेल. तुम्ही बँकेत जाऊन केवायसी दाखवून तुमचे पैसे काढू शकता.

Advertisement

10 वर्षांपासून बंद असलेल्या खात्यावरील पैसे बँका आरबीआयला देतात. रिझर्व्ह बँक ते पैसे ‘स्कीम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड’ (DEAF) मध्ये जमा करते. ज्यांचे मुख्य काम ठेवीदारांच्या हितांचे संरक्षण करणे आणि अशा इतर कारणांसाठी वापरणे आहे. दुसरीकडे विमा पॉलिसीद्वारे घेतलेली दाव्याची रक्कम मॅच्युरिटीनंतर 10 वर्षे झाली, तरी हा दावा केंद्र सरकारच्या वरिष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये (SCWF) जमा केला जात नाही, जिथून ही रक्कम सुविधा वाढविण्यासाठी खर्च केली जाते.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply