Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. फ़क़्त करोनाच नाही, तर राज्यावर आलेय हेही परंपरागत संकट..!

अहमदनगर :

राज्यात सध्या करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत रुग्णसंख्या लाखोंनी वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि अन्य महत्वाच्या वैद्यकिय उपकरणांची कमतरता जाणवत आहे. राज्यच नव्हे तर देशभरातच करोना व्हायरसने विक्राळ रुप धारण केले आहे. या संकटा बरोबरच हवामान बदलाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर आता कडाक्याच्या उन्हाळ्यात राज्यात काही ठिकाणी पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई नेहमीच जाणवते. त्यामुळे या काळात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यंदा राज्यात एप्रिल महिन्यातच टँकरने शंभरी पार केली आहे.

Advertisement

राज्यात आजमितीस १३२ टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
उन्हाळ्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी कडाक्याच्या उन्हात पायपीट करावी लागते. त्यामुळे त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. यावेळी तर परिस्थिती आधिकच भीषण आहे. कारण यावेळी देशभरात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या संकटाचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात निर्बंध आधिक कठोर केले आहेत.

Advertisement

तसेच या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. असे असले तरी अन्य संकटेही निर्माण होत आहेतच. काही दिवसांपासून हवामानात बदल होत असल्याने काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. पुढील काही दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. त्यानंतर आता उन्हाळ्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. एप्रिल महिन्यातच टँकरची संख्या १३२ पर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षात याच महिन्यात १७० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.

दरम्यान, मागील आठवड्यात टँकरची संख्या ९८ होती. मात्र जसजसा उन्हाळा तीव्र होत आहे त्या प्रमाणात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात टँकरची संख्या ३० ने वाढली आहे.
राज्यातील ठाणे जिल्ह्यात २७, रायगड ११, रत्नागिरी ५, पालघर २२, नाशिक १८, नगर ५, पुणे ४, सातारा ४, हिंगोली १, नांदेड २, अमरावती ४, बुलढाणा १०, यवतमाळ १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अन्य जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू केलेले नाहीत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply