Take a fresh look at your lifestyle.

मोदी हेच करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’; पहा डॉ. दाहिया यांनी असे नेमके का म्हटलेय ते

दिल्ली :

Advertisement

देशभरात करोना रुग्णसंख्या वाढत असतानाच कुंभमेळा आणि निवडणूक प्रचाराच्या सभा जोरात होत्या. त्यामुळे देशातील दुसरी लाट आणखी वेगाने फोफावली. अनेकांनी त्यावर टीका केली. त्याचवेळी भाजपच्या आयटी टीमने करोना रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसे मोठे काम करीत आहेत, याच्या पोस्ट फिरवल्या. मात्र, आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनीच मोदींना दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरवले आहे.

Advertisement

डॉ. दहिया यांनी मोदी हे करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचे म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडिया यांच्यासह ट्रिब्युन यांनीही याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात दहिया यांनी म्हटले आहे की, ज्यावेळी मेडिकल इमर्जन्सी होती त्यावेळी सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. अशावेळी मोदी हे लाखोंच्या प्रचारसभा घेत होते. नियम जास्तीतजास्त लोकांनी पाळावेत यासाठी काम चालू होते. त्यावेळी पंतप्रधानांनी प्रचार सभांमध्ये जाऊन करोनासंदर्भातील सर्व नियम मोडले. देशातील पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये सापडला होता. असा रुग्ण आढळल्यानंतरही मोदींनी उपाययोजनाद्वारे प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी थेट गुजरातमध्ये अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांची सभा घेतली.

Advertisement

डॉ. दहिया यांनी मांडलेले मुद्दे असे :

Advertisement
  • आरोग्य सेवा डळमळत असल्याचं चित्र दिसत असतानाही पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काहीही ठोस निर्णय घेतले नाहीत
  • अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यासंदर्भातील होकार केंद्राने न दिल्याने प्रकल्प रडखले
  • शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाही
  • आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिल्याने करोनाचा धोका वाढला
  • पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्याला जास्त प्राधान्य दिले  

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply