Take a fresh look at your lifestyle.

नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली; पहा नेमके काय म्हटलेय गुंदेचा यांनी आमदार जगतापांना

अहमदनगर :

Advertisement

नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांचे नाव न घेता टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल काळे यांनी म्हटले होते. त्यावर या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी पत्रक काढत खरमरीत टीका केली होती. मात्र, तरीही हा राजकीय वाद मिटलेला नाही. यावर आता काँग्रेसच्यावतीने पलटवार करताना ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. 

Advertisement

गुंदेचा यांनी म्हटले आहे की, विद्यमान आमदार हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सतत सात वर्ष ते या पदावर आहेत. त्यांना नगरकरांनी दोन वेळा महापौर होण्याची संधीही दिली होती. जवळपास तीन-साडेतीन वर्षे ते या पदावर काम करीत होते. त्यांचे वडील आमदार अरुणकाका जगताप हेही दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचा कालावधी जवळपास दहा वर्षांपेक्षा जास्त काळ आहे. एवढेच नाही तर आमदारांचे वडील हे मागील काळात पाच वर्षे अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्षदेखील राहिलेले आहेत. आमदारांच्या पत्नी या दोन वेळा नगरसेविका असून जवळपास सात वर्ष त्या पदावर काम करीत आहेत. 

Advertisement

गुंदेचा यांनी पुढे म्हटले आहे की, नगरकरांनी गेली अनेक वर्ष या कुटुंबाला सत्तेचा राहण्याची संधी दिलेली नाही. त्यांनी शहरासाठी महानगरपालिकेचे अद्यावत असे एक रुग्णालय उभारता येऊ नये ही नगर शहरातील नागरिकांसाठी शोकांतिकेची बाब आहे. आज कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे रुग्णालय मनपाच्या वतीने उभे केलेले असते तर शहरातील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालया प्रमाणे मोफत आरोग्य सेवा या ठिकाणी मिळू शकली असती. 

Advertisement

एकूणच महापालिका आणि राज्य सरकारच्या मदतीने नगर शहरातील नागरिकांना ऐन करोना संकटात मदतीसाठी पुढे येण्याची गरज असताना काँग्रेस पक्षाने याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य केलेले आहे. यावरून टीकाटिपण्णी चालू झालेली आहे. सोशल मीडियामध्ये याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे जे आतापर्यंत झाले नाही, असे काम यानिमित्ताने महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी मिळून करावे आणि शहरासाठी मोठे आरोग्य केंद्र उभे करावी, अशीच भावना सामान्य नगरकरांची आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply