Take a fresh look at your lifestyle.

अन दहावी नापास भामट्याने लावला पोलीस-वकिलांनाच चुना; पहा कुठे घडलाय ‘हा’ प्रकार

मुंबई :

Advertisement

तो दहावी नापास. शिक्षण नसल्याने माथाडी कामगार झाला. अभ्यासात डोके नसले, तरी ‘नको ते उद्योग’ करण्यात त्याचा हातखंडा होता. आपल्या याच ‘टॅलेंट’च्या जोरावर त्याने आपल्या सहकारी माथाडी कामगारांनाही चुना लावला. त्याच्या चलाखीतून घरचेही सुटले नाहीत. चक्क दोन महिलांसोबत त्याने संसार थाटले. मग वकील असो, वा पोलीस, सगळ्यांनाच त्याने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सचिन पवार (Sachin Pawar Crime News) असे या भामट्याने नाव आहे. ‘झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये..’ हे त्याने आपल्या ‘कर्तबगारी’ने दाखवून दिले आहे. एपीएमसी मार्केटमध्ये (Mumbai APMC Market) 2010 मध्ये माथाडी कामगार म्हणून त्याने काम सुरु केले. सुरुवातीलाच त्याने आपल्या ‘अनोख्या बुद्धिमत्ते’ची झलक दाखवली. घरासाठी कर्ज (Home Loan) काढून देतो, असे सांगून त्याने मार्केटमधील माथाडी कामगारांची फसवणूक केली. पहिले लग्न झालेले असताना, बायकोला अंधारात ठेवून पुन्हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. इथेच तो थांबला नाही.

Advertisement

सिडकोकडून मिळालेल्या भुंखडामध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून चक्क नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) कर्मचाऱ्यालाच गंडा घातला. त्यासाठी त्याने सोसायटीच्या खातेधारकाच्या खोट्या सहया करुन ‘विजया’ बँकेच्या मॅनेजरच्या (Vijaya Bank Manager) मदतीने सोसायटीमधील भुखंडासाठी तब्बल दीड कोटीहुन अधिक रक्कम जमा केली. चौकशी झालीच तर आपल्यावर बालंट नको, म्हणून ही रक्कम त्याने पत्नी, मेहुणा, दाजीच्या खात्यात टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून त्याने वकील, पोलीस कर्मचारी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही चुना लावल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत नवी मुंबईमध्ये 3 ते 4 फ्लॅट आणि 4 ते 5 शॉप, पनवेल येथे जमीन, गाडी, सोलापूर येथे शेतजमीन, अशी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केली आहे.

Advertisement

पनवेल पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांच्या आदेशानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक (पनवेल) अजय कुमार लांडगे आणि सहपोलीस निरीक्षक काळसेकर यांच्या चौकशीनंतर खारघर पोलीस ठाणे येथे सचिन पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार झाला आहे. या आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply