Take a fresh look at your lifestyle.

वधू-वर नि वऱ्हाडीही पीपीई किटमध्ये; पहा कुठे झालाय असा अनोखा विवाहसोहळा..!

पुणे :
लग्नघटिका समीप आलेली.. ‘नववधू प्रिया मी बावरते..’ अशा काहीशा अवस्थेत नववधू भावी आयुष्याची स्वप्ने रंगविण्यात हरवून गेली होती. नवरदेव लग्नाची तयारी करीत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकीच का असेना पण वऱ्हाडी मंडळींची लगबग चालली होती… आणि घात झाला.. मधेच खुद्द नवरदेवाचाच रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला.

Advertisement

आता कसे होणार, वधू-वराचे चेहरे पडले.. वऱ्हाडी मंडळीही गोंधळून गेली.. आता लग्न पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.. पण वधू-वर ठरलेल्या मुहूर्तावरच ‘लग्नाचा बार’ उडवून देण्यावर ठाम होते. अखेर नवरदेव लग्नाचा पोशाख सोडून पीपीई किट घालून तयार झाला.. नवरीनेही साज-शृंगार काढून पीपीई किट अंगावर चढवले. वऱ्हाडीही पीपीई किट घालूनच आले नि अशा एका आगळ्या-वेगळ्या ‘ड्रेसकोड’मध्ये वधू-वर बोहल्यावर चढले..’शुभ मंगल सावधान’ म्हटले गेले आणि दोनाचे चार हात झाले..

Advertisement

मध्य प्रदेशात रतलाम तालुक्यात ही घटना घडली. गेल्या वर्षी 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांनी ‘ऑनलाइन शुभमंगल’ उरकलं होत. व्हिडीओ कॉलवर वऱ्हाडी मंडळी लग्न सोहळ्याला हजर होते. नवरा एकीकडे अन् नवरी दुसरीकडे अशा प्रकारे काही विवाहसोहळे गेल्या वर्षाने अनुभवले होते. यंदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती गंभीर आहे. नातलगांना बोलावता येत नाही. त्यामुळे अनेकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे..

Advertisement

मध्य प्रदेशातील वधू-वराने ठरल्या तारखेलाच ‘सात जन्माच्या बंधना’त अडकण्याचा अट्टहास केला. विशेष म्हणजे, तेही खुद्द नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह असताना! या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये वधु-वर लग्नाच्या पोषाखाऐवजी चक्क पीपीई सुट्समध्ये दिसत आहेत. उपस्थित वऱ्हाडी मंडळीनीही पीपीई किट परिधान केले आहे.

Advertisement

तहसीलदारांचे अजब स्पष्टीकरण!
दरम्यान, रतलामच्या तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी नवरदेवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. लग्न थांबवण्यासाठी ते लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते, पण वधू-वराच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडला. या जोडप्याला पीपीई किट्स घालण्यास सांगण्यात आले, जेणेकरून कोरोना संक्रमण होणार नाही.

Advertisement

सोशल मीडियावर या व्हिडीओवर आणि तहसीलदारांच्या उत्तरावर अनेकांनी टीका केली आहे. या जोडप्याने काही काळ थांबून लग्नसोहळा करायला हवा होता, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तहसीलदारांच्या अशा प्रकारच्या निर्णयावरदेखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply