Take a fresh look at your lifestyle.

मग ‘त्या’ 150 जिल्ह्यांमध्ये होणार लॉकडाऊन; पहा काय आहे ‘केंद्रीय आरोग्य’चा प्रस्ताव

पुणे :

Advertisement

महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन केलेला असतानाच शेजारील गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत लॉकडाउन लागू केल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी शेवटचा पर्याय म्हणून लॉक डाऊन लागू करण्याचे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील 150 जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा मुद्दा मांडला आहे. वाढते रुग्ण लक्षात घेऊन राज्य सरकारशी चर्चा करून यावर निर्णय होणार आहे.

Advertisement

टाइम्स ऑफ इंडिया यांनी याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आरोग्य सुविधांचा तुटवडा असताना दुसरीकडे केंद्र सरकार करोनाला रोखण्यासाठी उपाययोजना चालू असतानाच केंद्राकडूनही लॉकडाउनचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. आरोग्य सुविधांवर ताण आलेले जिल्हे लक्षात घेऊन निर्णय व्हावा
  2. जिथे पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तिथेच लॉकडाउन करावा
  3. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव
  4. अंतिम निर्णय राज्य सरकारांसोबत चर्चा करून मगच केंद्र सरकारकडून घेतला जाणार
  5. मंत्रालयाने म्हटले आहे की, 150 जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज 
  6. करोनाची साखळी तोडण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात कडक लॉकडाउनची गरज

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होण्याच्या घोषणेच्या अगोदरच ‘लॉकडाऊन शक्यतो टाळावा, खूप गरज वाटली तरच अंतिम उपाययोजना म्हणून असा निर्णय घ्यावा’ असे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कडक लॉकडाऊन टाळून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, आता अनेक राज्यानाम्धील विधानसभा निवडणुका संपत असताना केंद्र सरकारही लॉकडाऊनचा मुद्दा पुढे आणत आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply