Take a fresh look at your lifestyle.

आणि पाणी बॉटलपेक्षा कमीत मिळणार असलेली लस झाली थेट 1200 रुपयांना..!

मुंबई :

Advertisement

व्यवसाय हा त्याच पद्धतीने करावा लागतो, आणि ग्राहकांनीही कंपनीला त्याच पद्धतीने पाहिले पाहिजे. मात्र, व्यवसायाला भावनिक जोड देऊन व्यवसाय करताना अनेकदा आश्वासनांची खैरात केली जाते. मग कंपन्या राजकारण्यांना मागे टाकतात, आणि ग्राहकही मग अशा मंडळींना थेट भारतरत्न देण्याची मागणी करतात. करोना लसबाबत असेच झाले. दोन्ही स्वदेशी कंपन्यांना असेच महत्व ग्राहकांनी दिले. मात्र, आता त्याच कंपन्यांनी व्यावसायिक गरज लक्षात घेऊन व्यावहारिक होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एकेकाळी पाणी बॉटलपेक्षा कमी किमतीत मिळेल अशी घोषणा झालेली करोना लस थेट 1200 रुपयांना पोहोचली आहे.

Advertisement

देशातील कोरोना लसच्या किंमतीसंदर्भात चर्चा तीव्र झाली आहे. कारण, लसीच्या सुरूवातीस केंद्र सरकारने लोकांना लसीकरण विनामूल्य असेल असेच सांगितले होते. यानंतर असे म्हटले गेले होते की, राज्यांनी त्यांच्या स्तरावर लस खरेदी करुन द्यावी. यानंतर कोरोना लसचे स्वदेशी उत्पादक असलेल्या भारत बायोटेक कंपनीने या लसचे दर जाहीर केले. नवीन दरानुसार कंपनीने राज्यांना एक डोस 600 रुपये तर, खासगी रुग्णालयांना तोच डोस तब्बल 1200 रुपये दराने दिले जातील असे जाहीर केले. यापूर्वी याच भारत बायोटेकने केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये भाव सांगितला होता. आता देशभरात लसचे भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

कंपनीचे चेअरमन डॉ. कृष्णा ऐल्ला लस तयार होताना म्हणाले होते की, आम्ही पाणी बाटलीपेक्षा कमी भावाने लस देऊ. पाण्यापेक्षा कमी दरात म्हणजे दहा रुपयांच्या आतच ही लस सामान्य माणसांना मिळणार होती. आता त्याच लसच्या डोसची किंमत 1200 रुपयांवर पोहोचली आहे. तथापि, ही वाढीव रक्कम संशोधन आणि इनोवेशन यासाठी वापरली जाणार असल्याचे आता कंपनी सांगत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, क्लिनिकल ट्रायल खर्च आणि इतर खर्च काढण्यासाठी असे करावे लागत आहे. संशोधन आणि विकासाचा खर्चही यावर झालेला आहे. यासाठी आम्हाला पैशांची गरज असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Advertisement

गेल्या वर्षी भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा म्हणाले होते की, कोवैक्सीन लस विकसित करण्यात सरकार आणि आयसीएमआर यांनी पाठिंबा दिला आहे. नंतर आता 21 एप्रिल रोजी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डॉ. कृष्णा यांनी स्वतः आयसीएमआरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले. ते म्हणाले की, लस विकसित करण्यात सरकारकडून कोणतीही रक्कम त्यांना मिळालेली नाही. आम्ही भारत सरकारकडून कोणतेही पैसे घेतलेले नाही. फेज 2, फेज 3 मधील क्लिनिकल चाचण्यांवर 350 कोटी रुपये खर्च केले आहेत. आम्ही कधीही सरकारकडून पैसे घेतलेले नाहीत.

Advertisement

भारत बायोटेक लस (कोव्हॅक्सिन) यांच्या लसला मर्यादित वापरास मान्यता मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. घाईघाईने लस मंजूर झाल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला होता. हे सर्वांसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते, असेही त्यावेळी म्हटले गेले होते. भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एला यांनी त्यावेळी स्पष्टीकरण दिले आहे की, काही लोकांकडून या लसचे राजकारण केले जात आहे. मला स्पष्टपणे सांगायचे आहे की माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे यावर कोणतेही राजकारण होऊ नये.

Advertisement

एकूणच ही देशातील मोठी कंपनी आहे. 1996 मध्ये याची स्थापना झाली. पुढे या कंपनीने आतापर्यंत तब्बल 160 पेटंट नोंदणी केले आहेत. BBIL कोरियन फूड एंड ड्रग्‍स एडमिनिस्‍ट्रेशन (KFDA) यांच्यातर्फे ऑडीट केलेली ही पहिली भारतीय कंपनी आहे. सीजियम क्‍लोराइड फ्री हेपेटाइटिस बी याची लस, इन्‍फ्लुएंजा टाइप आणि रेबीज यावरील लस या कंपनीने बनवलेल्या आहेत. बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्याकडून या कंपनीला मदत मिळालेली आहे. एकूणच अशा मोठ्या कंपनीचे चेअरमन जर त्यावेळी म्हणत होते की पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी किमतीत लस मिळेल. त्याच लसचा भाव इतका मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply