Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राज्याला लागणार तब्बल 12 कोटी लस; पहा काय असतील राज्य सरकारसमोरील अडचणी

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत करोना लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. भाजपनेही याचे स्वागत केले आहे. तर, सोशल मीडियामध्ये सध्या हा मुद्दा ट्रेंडमध्ये आहे. यासाठी राज्य सरकारला तब्बल 12 कोटी डोस खरेदी करावे लागतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीरम संस्थेने अगोदरच 20 मेपर्यंत लस मिळणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मग, आता 1 मेपासून लसीकरण सुरू करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर असेल.

Advertisement

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ट्विटर खात्यावर म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे!

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे! #MahaVaccination https://t.co/q7DdC0gM3p” / Twitter

Advertisement

महाराष्ट्रात 18 ते 44 या वयोगटाची लोकसंख्या तब्बल 5.41 कोटी इतकी आहे. अशावेळी प्रत्येकाला दोन डोस देण्यासाठी म्हणून राज्य सरकारला तब्बल 12 कोटी लसचे डोल लागणार आहेत. त्यामुळे हे तातडीने आणण्याचे आणि लसीकरण सुरू करण्याचे काम सरकारी यंत्रणेला करावे लागणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply