Take a fresh look at your lifestyle.

म्हणून 1 मेपासून लगेचच मोफत लसीकरण नाही; पहा नेमके काय म्हटलेय आरोग्यमंत्र्यांनी

मुंबई :

Advertisement

देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही 18 ते 45 वर्षे वयाच्या नागरिकांना करोना लस मोफत मिळणार आहे. लसचा डोस फुकट मिळणार की, विकत घ्यावा लागणार यावर आता पडदा पडला आहे. कारण, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, हे लसीकरण लगेचच दि. 1 मे 2021 पासून सुरू होऊ शकणार नाही.

Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, पुढील 6 महिन्यात 18 ते 44 या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे. या वयोगटासाठीचा लसीकरणाचा मोफत टप्पा मात्र, 1 मे पासून सुरू होणार नाही. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे.

Advertisement

सर्व नागरिकांनी समजुतदारीने काम घेऊन सरकारी यंत्रणेला सहकार्य करावे लागणार आहे, असे सांगतानाच टोपे म्हणाले आहेत की, नोंदणीसाठी कोविन अॅप सक्तीचे आहे. त्यामुळे त्यावर आधी नोंदणी करूनच केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने अशी नोंदणी बंधनकारक केली आहे. त्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply