Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : सर्वांना लसीकरण मोफतच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई :

Advertisement

देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही 18 ते 45 वर्षे वयाच्या नागरिकांना करोना लस मोफत मिळणार आहे. लसचा डोस फुकट मिळणार की, विकत घ्यावा लागणार यावर आता पडदा पडला आहे. कारण, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ट्विटर खात्यावर म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे!

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे! #MahaVaccination https://t.co/q7DdC0gM3p” / Twitter

Advertisement

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावर पहिली प्रतिकिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आम्ही त्या निर्णयाचे स्वागत करतो. १ मे पासून राज्यात होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार असल्याचे अनेकांनी सोशल मीडियामध्ये स्वागत केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply